राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी एका कार्यक्रमात विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबाबत वक्तव्य केले आहे. अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा निलेश लंके यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे त्याबाबत राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
अशात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी एकदम स्पष्टपणे याबाबत उत्तर दिले आहे. अजित दादा मुख्यमंत्री व्हावे ही अनेकांची इच्छा असली तरी आमच्याकडे संख्याबळ नाही. संख्याबळ असते तर सहकारी पक्षांना विचारात घेऊन त्याबाबत निर्णय घेता आला असता, असे शरद पवारांनी म्हटले आहे.
शरद पवार हे सध्या नाशिक दौऱ्यावर आलेले आहे. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. पत्रकारांनी बोलत असताना त्यांनी राज्यात घडणाऱ्या वेगवेगळ्या घडामोडींवर भाष्य केले आहे. त्यावेळीच त्यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता.
निलेश लंके यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, अजितदादा मुख्यमंत्री व्हावे ही अनेकांची इच्छा आहे. पण तसे असले तरी आमच्याकडे तितके संख्याबळ नाहीये. जर तितके संख्याबळ असते तर आमच्या सहकारी पक्षांना विश्वासात घेऊन त्याबाबत निर्णय घेतला असता.
तसेच शरद पवारांंनी नाना पटोलेंबाबतही वक्तव्य केले आहे. महाविकास आघाडीत कुठलाही वाद नाही. नाना पटोलेंनी राजीनामा देऊन एक वर्ष झालं आहे. आता त्यावर चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही. पटोलेंनी राजीनामा देतांना सगळ्यांचा विश्वासात घेतलं नाही, हीच फक्त त्यांची चुक होती. पण आता तो विषय संपला आहे, असे शरद पवारांनी म्हटले आहे.
शरद पवारांनी नरेंद्र मोदींच्या मुंबई महाराष्ट्र दौऱ्यावरही भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, मुंबई मनपाची निवडणूक पाहून मोदी महाराष्ट्रात येत आहे हरकत नाही. ते जर महाराष्ट्राला काही देत असतील तर काहीच हरकत नाहीये. पण ते महाराष्ट्रात येऊन जर राजकीय भाषण देत असतील. तर त्याचा त्यांनीच विचार करावा, असेही शरद पवारांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
..म्हणून ठाकरे अन् अजितदादांनी सांगूनही मी अर्ज मागे घेतला नाही; कलाटेंनी सांगितलं खरं कारण
माणूस आहे की राक्षस! दाम्पत्याने पाच महिने केली मोलकरणीला मारहाण, नग्न करुन…
अजून त्यांच्या सरणाची राख निवली सुद्धा नसेल, तुम्ही…; वसंत मोरेंचा शिंदे फडणवीसांना सवाल, राज ठाकरेंची झाली कोंडी