भाजप आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर कसाबा आणि चिंचवड मतदार संघाच्या पोटनिवडणूकीची घोषणा करण्यात आली आहे. त्यासाठी महाविकास आघाडीने आणि भाजपने आपला उमेदवारही दिला आहे.
मनसेने मात्र याबाबत अजूनही आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे शनिवारी कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणूकीबाबत आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. या दोन्ही निवडणूकींमध्ये राज ठाकरे भाजपला पाठिंबा देण्याची शक्यता आहे.
असे असतानाच मनसे नेते वसंत मोरे यांनी पोटनिवडणूकींवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर काही प्रश्न उपस्थित केले आहे. विधानसभेची निवडणूक होते मग महापालिकेची का नाही? असा प्रश्न वसंत मोरे यांनी उपस्थित केला आहे. या प्रश्नामुळे राज ठाकरे या्ंची पण कोंडी झाल्याचे म्हटले जात आहे.
वसंत मोरे यांनी एक फेसबूक पोस्ट केली आहे. त्यामध्ये ते म्हणाले की, माझा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना एक प्रश्न आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील भाजपचे दोन आमदार नुकतेच मयत झाले आहे. अजून त्यांच्या सरणाची राख निवली सुद्धा नसेल, तुम्ही मते कमी होतील म्हणून लगेच तिथल्या निवडणूका घेत आहे.
मग मागील एक वर्षापासून आमच्या शहाराला कोणताही नगरसेवक नाही. प्रशासनाने शहराचे वाटोळे लावले आहे. विकास कामे ठप्प आहे. निधी नसल्यामुळे नागरिकांना थोबाड दाखवू वाटत नाही. त्यामुळे तुम्ही पालिका निवडणूका का घेत नाही?
पुण्यातील आमदार खासदारांनी जरा आमच्या चपलेत पाय घालून पहावे आणि हो जर कोणत्या पक्षाला सहनुभुती मिळेल म्हणून जर निवडणुका टाळत असताल तर तुमचा पराभव निश्चित समजा कारण जो मनातून हारतो तो रणात काय जिंकणार….
महत्वाच्या बातम्या-
काश्मीरमध्ये सापडला भारतातील सर्वात मोठा खजिना, पालटणार अख्ख्या भारताचं नशीब
आता अदानी ग्रुप हिंडनबर्गला शिकवणार धडा, उचललं ‘हे’ मोठं पाऊल
नाना पटोलेंच्या ‘या’ कृतीमुळेच पडले मविआचे सरकार; शिवसेनेची खदखद अखेर आली बाहेर, केले गंभीर आरोप