चिन्मय मांडलेकरच्या गांधी विरूद्ध गोडसेचा वाद पेटला; आता दिग्दर्शक म्हणतात..

सध्या गांधी-गोडसे एक युद्ध या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार संतोषी बऱ्याच वर्षांनी पुन्हा या चित्रपटाच्या माध्यमातून पदार्पन करत आहेत. नुकतीच त्यांनी या चित्रपटाबाबत एक मुलाखत दिली आहे. यावेळी त्यांनी असा खुलासा केली की, हा चित्रपट सेंसर बोर्डातून पास होणार नाही याची भीती त्यांना वाटत होती.

त्यांची भिती तेव्हा टळली जेव्हा बोर्डाने एकही बदल न सुचवता चित्रपटाला प्रमाणपत्र दिलं. विशेष म्हणजे, गांधी गोडसे एक युद्ध महात्मा गांधींच्या वेगळ्या स्वरूपावर आधारित आहे. चित्रपटात कोणताच कट नसल्याचेही त्यांनी सांगितले. गांधी गोडसे एक युद्ध या चित्रपटात दीपक अंतानी महात्मा गांधींची भूमिका साकारत आहे. तर चिन्मय मांडलेकर नथुराम गोडसेची भूमिका साकारत आहे.

हा चित्रपट 1947-48 च्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. यामध्ये नथुराम गोडसे आणि महात्मा गांधी यांच्या विचारांचे युद्ध दाखवले आहे. या चित्रपटात महात्मा गांधी आणि नथुराम गोडसे या दोघांच्याही बाजू दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामध्ये नथुराम गोडसेने मोहनदास करमचंद गांधी यांच्या हत्येचा प्रयत्न का केला हे स्पष्ट केले आहे.

राजकुमार संतोषी यांनी याआधी द लिजेंड ऑफ भगत सिंग सारखे लोकप्रिय चित्रपट केले आहेत. राजकुमार संतोषी यांची मुलगी तनिषा संतोषीही या चित्रपटातून पदार्पण करत आहे. नथुराम गोडसेचा महात्मा गांधींच्या हत्येचा प्रयत्न अयशस्वी व्हावा, अशा पद्धतीने चित्रपटाची कथा गुंफण्यात आली आहे.

यानंतर महात्मा गांधी नथुराम गोडसेला भेटण्यासाठी तुरुंगात जातात. यानंतर दोघेही आपापल्या विचारांची देवाणघेवाण करतात असं दाखवण्यात आलं आहे. या चित्रपटाला संगीत ए आर रहमानने दिले आहे. या चित्रपटाची निर्मिती मनिला संतोषी यांनी केली आहे.

हा चित्रपट 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रदर्शित होणार आहे. राजकुमार संतोषीचा मागील चित्रपट 2013 मध्ये आला होता. त्याने शाहिद कपूरसोबत फाटा पोस्टर, निकला हिरो बनवले. महात्मा गांधी आणि नथुराम गोडसेंबद्दल लोकांच्या मनात अनेक मतभेद आहेत. हा चित्रपट पाहिल्यानंतर ते दूर होतील की आणखी वाढतीले हे 26 जानेवारीलाच कळेल.

महत्वाच्या बातम्या
पुणे स्टेशन बॉम्बने उडवण्याची धमकी कोणी दिली? सत्य समोर आल्यावर पोलिसही चक्रावले
भारतीय क्रिकेटवर कोसळला दुखाचा डोंगर, २८ वर्षीय गोलंदाजाचे निधन; मृत्यूचे धक्कादायक कारण आले समोर
भारतीय क्रिकेटविश्व हादरले! २८ वर्षांच्या ‘या’ दिग्गज गोलंदाजाचा अचानक मृत्यू; उद्याच होती मॅच..
पोराला कुस्तीपटू करण्यासाठी बापाने ५ एकर जमीन विकली; मुलानं ‘अशी’ केली परतफेड