महाराष्ट्र केसरी 2023 चा अंतिम सामना पुण्यात झाला. या स्पर्धेत अंतिम सामन्यात पुण्याच्या शिवराज राक्षेने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला चितपट करत फायनल जिंकली. पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील असलेला शिवराज राक्षे ठरला आहे २०२३ चा महाराष्ट्र केसरी. त्यानंतर तुफान जल्लोश करण्यात आला.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेची गदा जिंकणे हे सर्व पैलवानांचे स्वप्न असते. मात्र यावेळी शिवराज राक्षे यांनी वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे. महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत शिवराजने गदा जिंकली आणि कमी वयातच एका लहान शेतकरी कुटुंबातील मुलगा महाराष्ट्र केसरी बनला.
शिवराजच्या घरात लहानपणापासूनच कुस्तीचे वातावरण होते. कारण शिवराजचे आजोबा कुस्ती करायचे आणि वडील कुस्ती करायचे. त्यामुळेच शिवराजला लहानपणापासूनच कुस्तीचे वेड होते. मात्र यासाठी त्याला आई-वडिलांची चांगली साथ मिळाली आणि त्यामुळेच भारताला नवा महाराष्ट्र केसरी मिळू शकला.
शिवराजचे वडीलही कुस्तीपटू होते, पण आर्थिक पाठबळ नसल्यामुळे त्यांना कुस्ती सोडून द्यावी लागली. मात्र शिवराजने आता वडिलांचे स्वप्न साकारले आहे. शिवराजचे वडील छोटे शेतकरी, दूध डेअरीचा छोटासा व्यवसायही करतात. पण घरची परिस्थिती दयनीय आहे.
पण ते महान कुस्तीपटू होऊ शकले नाहीत, पण त्याच्या वडिलांची इच्छा होती की आपल्या मुलाने खूप उंची गाठावी. त्यामुळेच त्यांनी पैशांपेक्षा आपल्या मुलाच्या कुस्तीला महत्त्व दिले. त्यामुळे कुस्ती शिकताना शिवराजला काही कमी पडणार नाही याची काळजी त्यांनी घेतली.
शिवराज यांचे बालपण पुण्यातील राजगुरुनगर या गावात गेले. शिवराज सुरुवातीला राजगुरुनगरच्या राक्षेवाडीत कुस्तीसाठी प्रसिद्ध झाला. यानंतर जिल्ह्यापासून ते राज्यपातळीपर्यंत त्यांनी सातत्याने जोरदार कामगिरी केली. सगळीकडे तो बक्षीसांची लयलूट करत होता.
त्यानंतर तो महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी हर्षवर्धन सदगीर विरुद्ध लढणार होता, तेव्हा त्याच्या चाहत्यांना खूपच काळजी लागली होती. कारण हर्षवर्धन हा मोठा मल्ल मानला जातो. शिवराजवर अंतिम लढतीपेक्षाही सर्वात जास्त दडपण होते ते हर्षवर्धन सदगीरसोबतच्या लढतीचे.
कारण हर्षवर्धन हा अनुभवी कुस्तीपटू होता. त्यामुळे या लढतीत आपले काय होणार, असा प्रश्न त्याला पडला होता. मात्र शिवराजने या सामन्यात दमदार खेळ दाखवत विजय मिळवला. त्याने हर्षवर्धन सदगीरला सहज पराभूत केले. आता शेवटचे लक्ष्य होते ते अंतिम फेरीचे.
पहिल्या उपांत्य फेरीत मॅट विभागातील विजेता शिवराज राक्षे आणि दुसऱ्या उपांत्य फेरीत माती विभागातील विजेता महेंद्र गायकवाड यांनी बाजी मारली होती. त्यामुळे या दोन विजयी पैलवानांमध्ये अंतिम सामना रंगला होता. दोन्हीही पैलवान तुल्यबळ होते. तरीही अंतिम सामना खूपच एकतर्फी झाला. अवघ्या २ मिनिटाच्या आत शिवराज राक्षेने बाजी मारली.
महत्वाच्या बातम्या
पोरगा कुस्तीपटू व्हावा म्हणून बापाने ५ एकर विकली, पोराने महाराष्ट्र केसरीत सुवर्णपदक मिळवत केलं चीज
सिकंदर शेखचे महाराष्ट्र केसरी जिंकण्याचे स्वप्न भंगले, लोक म्हणाले, त्याच्यावर अन्याय झाला कारण
पुण्याचा शिवराज राक्षे ठरला २०२३ चा महाराष्ट्र केसरी; महेंद्र गायकवाडला चितपट करत जिंकली फायनल