Share

शिर्डीला जाण्यासाठी पत्नीने केला हट्ट, त्याने सुट्टीही घेतली, पण काळाने घातला घाला अन् अख्ख कुटुंबच संपल

sinnar

naresh ubale family accident  | गेल्या काही दिवसांपासून रस्ते अपघाताच्या अनेक धक्कादायक घटना समोर येत आहे. काही अपघातांमध्ये तर लोकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. आता अशीच एक घटना मोरीवली येथून समोर आली आहे. शिर्डीला जात असताना एका बसला अपघात झाला आहे.

हा अपघात नाशिक जिल्ह्यातील घोटी सिन्नर महामार्गावर झाला आहे. या अपघातामध्ये १० जणांचा मृत्यू झाला आहे. यात मोरीवली गावातील दोन कुटुंबांमधील चार जणांचा समावेश आहे. तर त्या १० जणांपैकी ८ जण हे मोरीवलीतील होते. या भयानक अपघातामुळे मोरीवलीत एकच खळबळ उडाली आहे.

अंबरनाथ जवळील मोरीवली येथील काही रहिवासी गुरुवारी रात्रीच्या सुमारास एकूण १५ बसेसनी शिर्डीला निघाले होते. त्यामधील एका बसला घोटी सिन्नर महामार्गाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात बारस्कर आणि उबाळे कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे.

नरेश उबाळे यांच्या पत्नी वैशाली यांना शिर्डीला जायचे होते. त्यासाठी त्यांना पासेस मिळाले होते. त्यामुळे त्यांनी नरेश उबाळे यांच्यासमोर शिर्डीला जाण्याचा हट्ट धरला. त्यामुळे नरेश यांनी पत्नीच्या हट्टामुळे सुट्टी घेतली आणि ते पत्नी वैशाली आणि मुलगी निधी व मधुरा यांच्यासह शिर्डीला निघाले.

अशात रस्त्यातच त्या बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात नरेश उबाळे आणि त्यांची पत्नी वैशाली उबाळे यांचा मृत्यू झाला आहे. तर ९ वर्षीय निधी गंभीर जखमी झाली आहे. नरेश हे एका वाईन शॉपमध्ये काम करत होते. त्यांना ३ मोठे भाऊ होते. त्यांच्या घरातील एकूण १७ जण देवदर्शनसाठी गेले होते.

सुहास बारस्कर हे सुद्धा त्या बसमध्ये होते. त्यांची पत्नी आणि दोन मुले या बसमध्ये होती. या अपघातात त्यांची पत्नी श्रद्धा आणि मुलगी श्रावणीचा मृत्यू झाला आहे. तर सुहास आणि मोठी कन्या शिवन्या हे जखमी झाले आहे.

महत्वाच्या बातम्या-
devendra fadanvis : पंकजा मुंडे ठाकरे गटात गटात जाणार? देवेंद्र फडणवीस म्हणाले, त्या मातोश्रीवर…
तो फडणवीसांचाच गेम प्लान! ‘इथून’ हलली सुत्रे, विखेही चेकमेट; वाचा तांबेंच्या बंडाची इनसाईड स्टोरी
BCCI चा रोहीत विराटला दणका! ट्वेंटी संघातून केली कायमची हकालपट्टी, ‘या’ नव्या खेळाडूंना संधी

ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now