Politics: राजकारणात डावपेचांची कमी नसते. मात्र, साध्य नाशिक विधान परिषद निवडणुकीत झालेल्या डावपेचांनी सर्वांनाच थक्क करून टाकले आहे. थोरात-तांबे कौटुंबिक संघर्षाला सुरुवात, वडिलांनी मुलासाठी घेतलेली माघार यामुळे राजकीय वर्तुळात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.
हा गोंधळ नेमका कसा सुरू झाला ? कुणी सुरू केला ? याच उत्तरं खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी दिलं आहे. काही दिवसांपूर्वी सत्यजित तांबे यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी त्यांनी अनेक सूचक वक्तव्ये केली होती. ज्याचा संदर्भ थेट नाशिक विधानसभा निवडणुकीशी होता.
‘सत्यजित तांबे यांच्यासारखे नेते तुम्ही किती दिवस बाहेर ठेवणार, असे लोक जास्त दिवस बाहेर ठेवले, की आमची नजर त्यांच्याकडे जाते,’ असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी केले होते. यावेळीच फडणवीसांनी सत्यजित तांबेंसाठी राजकीय जाळे विणले होते. यामुळे ‘नाशिक मधील राजकीय नाट्य’ हा फडणवीसांचा गेम प्लॅन होता हे कळून येत आहे.
तांबे व थोरात हे काँग्रेसचे निष्ठावान शिलेदार समजले जातात. डॉ. तांबेनी नाशिक मतदारसंघ बऱ्यापैकी काँग्रेसमय केला आहे. या मतदारसंघात सत्ता मिळवण्यासाठी भाजपने अनेकदा प्रयत्न केला. परंतु, यश आले नाही. म्हणून आता भाजपने थेट तांबे कुटुंबालाच लक्ष्य केले.
फडणवीसांनी पुस्तक प्रकाशन सोहळ्यात दिलेल्या जाहीर संकेतामुळेच सत्यजित तांबेनी आमदारकीचे स्वप्न पाहिले असावे. त्यामुळे सुधीर तांबेंची उमेदवारी जाहीर होऊनही त्यांनी अर्ज न भरणे, भाजपकडून अधिकृत उमेदवारी अर्ज कोणालाही न देणे आणि शेवटच्या दिवशी घडलेल्या नाट्यमय घटना यामागे फडणवीस यांनीच गेम प्लॅन आखला आहे.
विशेष म्हणजे बाळासाहेब थोरात रुग्णालयात असताना भाजपने एवढी सूत्रे हलवली आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या गेम प्लॅनमुळे थोरात- तांबे कुटुंबात पडलेली वादाची ठिणगी, ऐन मोक्यावर थोरतांची झालेली कोंडी, काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षाची नाचक्की असे परिणाम झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- उर्फी जावेदसारख्याच एका मॉडेलचा चित्रा वाघ यांच्याकडून सत्कार, सोशल मिडीयावर फोटो व्हायरल
- भारतीय क्रिकेटवर कोसळला दुखाचा डोंगर, २८ वर्षीय गोलंदाजाचे निधन; मृत्यूचे धक्कादायक कारण आले समोर
- …म्हणून शरद पवारांनी सांगीतले तर मी कोरड्या विहीरीतही उडी मारल; निलेश लंकेंचे वक्तव्य