devendra fadanvis on pankaja munde | भाजपमध्ये पंकजा मुंडेंना अनेकदा डावललं जात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे त्या नाराज झाल्याच्याही दिसून आल्या आहे. आता पुन्हा एकदा त्या नाराज असल्याच्या बातम्या येत आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात हा चर्चेचा विषय ठरला आहे.
मध्यंतरी पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर आली होती. असे असतानाच आता ठाकरे गटातील आमदाराने पंकजा मुंडे यांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली आहे. पंकजा मुंडे या शिवसेनेत आल्या तर आनंदच आहे, असे आमदाराने म्हटले होते.
आमदाराच्या या ऑफरवर पंकजा मुंडे काय निर्णय घेणार यावर चर्चा सुरु आहे. असे असताना आता भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडे पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा खोट्या आहेत, असे फडणवीसांनी म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांना पंकजा मुंडेबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी फडणवीस म्हणाले की, कुठल्याही प्रकारे पंकजा मुंडे पक्ष सोडणार नाही आणि त्या मातोश्रीवरही जाणार नाही. तर बावनकुळे म्हणाले की, पंकजा मुंडे या भाजपमध्ये खुश आहे.
पंकजा मुंडे या राज्यातील महत्वाच्या नेत्या आहे. पण भाजपमध्ये त्यांच्यावर अन्याय होतोय. ही त्यांच्या पक्षांतर्गत बाब आहे. त्यामुळे आम्ही काही बोलणार नाही. त्यांच्या कर्तृत्वाची आम्हाला नेहमीच कदर असेल. पण त्यांना शिवसेनेत यायचे असेल तर त्यांचे आम्ही स्वागत करु, असे आमदार सुनील शिंदे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पंकजा मुंडे यांनी सातत्याने डावललं जात असल्याची चर्चा आहे. तसेच त्या भाजपला सोडचिठ्ठी देऊ शकतात, असेही म्हटले जात आहे. त्यामुळे इतर पक्षांकडून त्यांना ऑफर येत आहे. पण आता फडणवीसांनी या चर्चांवर पुर्णविराम लावला आहे.
महत्वाच्या बातम्या-
भारतीय क्रिकेटवर कोसळला दुखाचा डोंगर, २८ वर्षीय गोलंदाजाचे निधन; मृत्यूचे धक्कादायक कारण आले समोर
पृथ्वी शॉचे गाऱ्हाणे साईबाबाने ऐकले, दिले श्रद्धा अन् सबुरीचे फळ! ३ वर्षांनी टिम इंडीयात निवड
…म्हणून शरद पवारांनी सांगीतले तर मी कोरड्या विहीरीतही उडी मारेल – आमदार निलेश लंकेंचे वक्तव्य