“सगळे घाव झेलायला ताई आणि मलाई खायला मात्र…”, पंकजा मुंडेंबाबत स्पष्टच बोलल्या प्रीतम मुंडें

Politics: भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) त्याच्या कामामुळे नेहमीच चर्चेत असतात. नुकतेच त्याची छोटी बहीण भारतीय जनता पार्टीच्या खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांनी मोठ वक्तव्य केले आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

नाशिक (Nashik) येथे विद्यार्थींशी संवाद साधताना प्रीतम मुंडे आपल्या थोरल्या बहिणीबद्दल बोलल्या. प्रीतम मुंडें म्हणाल्या, सगळे घाव झेलायला ताई आहे आणि मलाई खायला मी आहे. तसेच, आज सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास हा भारतीय जनता पार्टीचा नारा दिला.

पुन्हा बोलताना प्रीमत मुंडे म्हणाल्या, भारतीय जनता पक्षाचा नारा प्रत्यक्षपणे 40 वर्षे ज्यांनी आपल्या राजकीय आयुष्यात जगले ते म्हणजे गोपीनाथ मुंडे होय. त्यामुळेच मी स्वतःला खुप भाग्यवान समजते की, माझा जन्म मुंडे कुटुंबात झाला आहे.

त्याचवेळी, प्रीतम मुंडे यांनी विद्यार्थ्यांना एक प्रेरणादायी उदाहरण दिले. आम्ही खूप नशिबवान माणसं आहोत. कारण माझा किंवा राहुल कराडचा जन्म आमच्या घरी झाला. पण गोपीनाथ मुंडे किंवा विश्वनाथ कराड यांचा जन्म कुठल्याही श्रीमंत घराण्यात झाला नसुन ते एका सामन्य कुटुंबात जन्मलेले आहेत.

दरम्यान, प्रीतम मुंडे यांनी विद्यार्थ्यांसमोर एक प्रश्न उपस्थित केला. त्या म्हणाल्या की, तुम्हाला प्रीतम मुंडें व्हायचं की गोपीनाथ मुंडे व्हायचं हा तुमचा निर्णय आहे. तुम्ही ठरवल तर तुम्ही गोपीनाथ मुंडे किंवा विश्वनाथ कराड का होऊ शकत नाही? मनाची पक्क ठरव आणि योग्य दिशेने वाटचाल करा, असं केलंत तर तुम्हाला एक दिवस निश्चित फळ मिळेल. असेही प्रीतम मुंडे म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या –