ved 9 days box office collection | रितेश देशमुख आणि जेनेलिया यांच्या वेड या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. दोघेही खुप वर्षानंतर एकत्र झळकले आहे. वेड चित्रपटातील रितेश आणि जेनेलियाचा लुक भारावून टाकणारा आहे. याआधीही लोकांनी पडद्यावर त्यांच्या जोडीला पसंत केले होते.
आता दोघे पुन्हा वेड या चित्रपटातून चर्चेत आले आहे. ३० डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. कित्येक दिवसांपासून या चित्रपटाची प्रेक्षक वाट पाहत होते. पण अखेर हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला अजय-अतुल यांनी संगीत दिले आहे.
तसेच चित्रपटात रितेश आणि जेनेलिया सोडून अनेक प्रसिद्ध कलाकारही आहे. रवी जाधव, जितेंद्र जोशी, अशोक सराफ, सचिन पिळगावकर, अशुतोष गोवारीकर, फराह खान, सोनाली बेंद्रे, विशाल चोप्रा असे बरेच कलाकार या चित्रपटात आहे. या चित्रपटाला मराठी प्रेक्षकांकडून खुप चांगला प्रतिसाद मिळत आहे.
वेड बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत आहे. जेनेलियाचा हा पहिलाच मराठी सिनेमा आहे. त्यामुळे तिचा अभिनय कसा असेल? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. पण जेनेलियाने सुद्धा चित्रपटात खुप छान काम केले आहे. चित्रपट रिलिज होऊन ९ दिवस झाले असले तरी त्याची जादू अजूनही कायम आहे.
आता वेडच्या ९ व्या दिवशीचे आकडे समोर आले आहे. पहिल्या आठवड्यात वेडने बेक्कार कमाई केली होती. पहिल्याच दिवशी चित्रपटाने २.२५ चा गल्ला जमावला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ३.२५, तिसऱ्या दिवशी ४.५०, चौथ्या दिवशी ३.०२, पाचव्या दिवशी २.६५, सहाव्या दिवशी २.५५, सातव्या दिवशी २.४५, आठव्या दिवशी २.५२ आणि नवव्या दिवशी तब्बल ५ कोटी, अशी कमाई केली आहे.
रितेश जेनेलियाच्या वेडने सर्वांनाच वेड लावले असून आतापर्यंत वेडने २७ कोटींचा टप्पा पार केला आहे. तसेच १० वा दिवस हा रविवार असल्यामुळे आता या विकेंडला वेड किती कमाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. प्रेक्षकांनी ज्या पद्धतीने या चित्रपटाला प्रतिसाद दिला आहे, त्याबद्दल रितेश आणि जेनेलियाने सुद्धा प्रेक्षकांचे खुप आभार मानले आहे.
महत्वाच्या बातम्या-
rohit pawar : शरद पवारांंनंतर आता नातवाचीही क्रिकेटमध्ये एंट्री, रोहित पवार बनले महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष
पत्र्याच्या शेड मध्ये व्यवसाय सुरू करून कमावले चक्क 400 कोटी! माहिती वाचून तुम्हीही व्हाल थक्क
शीना बोरा जिवंत असल्याचा दावा, गुवाहाटीत ‘या’ ठिकाणी दिसली शीना बोरा