‘ही’ गोष्ट जर उद्धव ठाकरेंना समजली तर ते आणि रश्मी ठाकरे संजय राऊतांना चपलेने मारतील

Sanjay Raut and Narayan Rane: महाराष्ट्र सध्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे त्यांच्या परख वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि राऊत यांच्यात जोरदार आरोप प्रत्यारोप होत आहेत. शुक्रवारी संजय राऊत यांनी भाजप नेते राणे यांची खरडपट्टी काढली होती. त्यानंतर आता नारायण राणेंनीही प्रत्युत्तर देत खळबळजनक दावा केला आहे.

नारायण राणे म्हणाले, “मी खासदार झाल्यानंतर संजय राऊत यांनी माझी भेट घेतली होती. त्यावेळी राऊत यांनी मला उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्याबद्दल बरंच काही सांगितले आहे. ते सर्व मी एक दिवस उद्धव ठाकरे यांनी भेटुन सांगणार आहे. त्यानंतर उद्धव आणि त्यांची पत्नी रश्मी दोघेही राऊत यांना चप्पल मारतील.” असा दावा त्यांनी केला आहे.

खरे तर नारायण राणेंना सुरक्षेशिवाय चालण्याचे आव्हान संजय राऊत यांनी दिले. राणेंनीही हे आव्हान स्वीकारलं आहे. ते म्हणाले, संजय राऊत यांनी मला सुरक्षेशिवाय चालण्याचे आव्हान दिले. राऊत कुठे यायचे ते सांग, मी आजच तिथे यायला तयार आहे.

संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल करताना राणे म्हणाले,माझा इतिहास शिवसेनेच्या उभारणीत आहे, शिवसेनेला नष्ट करण्याचा नाही. पण संजय राऊत यांनी शिवसेना संपवण्याची सुपारी घेतली आहे. आजही त्यांच्या मनात ते शिवसेना संपवण्याची इच्छा आहे. राज्यात शिवसेनेचे 56 आमदार होते. आता फक्त 12 उरले असून राऊत त्यांनाही गमावण्याच्या तयारीत आहेत.

नुकत्याच केलेल्या आरोपाला धुडकावून लावत संजय राऊत यांनी नारायण राणे यांना प्रतिउत्तर दिले आहे. संजय राऊत म्हणाले की, नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर मी त्यांना आयुष्यात भेटलोच नाही. यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

यादरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे मंत्रिपद धोक्यात आहे. त्यामुळे ते ठाकरे घराण्यावर आणि आपल्यावर पातळी सोडून टिका करताये, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केलं होता.

महत्वाच्या बातम्या-
Yogesh Kadam : योगेश कदमांचा अपघात नाही तर घातपात; मातोश्रीच्या आशीर्वादाने अनिल परबांचा कदमांना संपवण्याचा प्रयत्न..
झंझावाती शतकानंतर सूर्याने पुन्हा जिंकले मन, ‘या’ खास व्यक्तीला दिले श्रेय; म्हणाला, ‘ते प्रत्येक वेळी माझी साथ देतात..
urfi javed : आता चित्रा वाघ गप्प का? त्यांचे तर कपडे सुद्धा..; महीला भाजप नेत्यावरून ऊर्फीने पुन्हा डिवचलं