Share

aditya thackeray  : सुशांत प्रकरणात आदित्य ठाकरेंनीच रियाला पुरवली सुरक्षा? रीया म्हणाली मी स्वतःच सांगत होते की…

aditya thackeray riya chakravarthy

riya chakraborthy on aditya thackeray  | अभिनेता सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणाला जवळपास अडीच वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. अशात पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आले आहे. शिंदे गटाचे खासदार राहूल शेवाळे यांनी आता शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे.

सुशांत सिंग राजपूत प्रकरणाच्यावेळी रिया चक्रवर्तीचे आदित्य ठाकरे यांना ४४ फोन आले होते, असा दावा राहूल शेवाळे यांनी केला आहे. त्यामुळे राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. तसेच रिया चक्रवर्तीच्या मोबाईलवर फोन आलेला AU ही व्यक्ती कोण होती? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अशात रिया चक्रवर्तीनेच सांगितलं आहे की AU नावाने नंबर सेव्ह असलेली व्यक्ती कोण आहे. याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. रियाने एक मुलाखत दिली होती. त्यामध्ये AU नावाने नंबर सेव्ह असलेल्या व्यक्ती आदित्य ठाकरे नसल्याचे तिने म्हटले आहे.

माझी एक मैत्रीण आहे अनाया उदास. तिचा नंबर माझ्या मोबाईलमध्ये AU नावाने सेव्ह आहे. पण सगळे म्हणतात AU म्हणजे आदित्य उद्धव आहे. अनायाने सुद्धा यावर स्पष्टीकरण दिलं आहे. आम्ही पण त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. पण वारंवार त्या AU शी आदित्य ठाकरेंचं नाव जोडलं जात आहे, असे रियाने म्हटले आहे.

https://twitter.com/GhadiSanjana/status/1605591830933827586

आदित्य ठाकरे रियाला संरक्षण देत असल्याचे म्हटले जात होते. त्यावर बोलताना रिया म्हणाली की, मी आजपर्यंत आदित्य ठाकरेंना कधी भेटले नाही. माझं त्यांच्याशी कधी बोलणंही झालं नाही. मला कुणीही संरक्षण देत नाही. मीच तर म्हणतेय की मला संरक्षण द्या, असेही रियाने म्हटले आहे.

रियाचा हा व्हिडिओ शिवसेना नेत्या संजना घाडी यांनी शेअर केला आहे. असे असले तरी या प्रकरणावरुन आता पुन्हा वाद वाढण्याची शक्यता आहे. शिवसेना नंतर भाजप नेतेही आदित्य ठाकरेंना घेरताना दिसून येत आहे. सुशांत प्रकरणाची चर्चा झाली तर आदित्य ठाकरेंचेच नाव का आधी समोर येते? याचा विचार करायला हवा, असे भाजप नेते नितेश राणे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
tanaji sawant : आरोग्यमंत्र्यांना ‘ओमिक्रॉन’ नावंही घेता येईना; सर्वांसमोर डोकं खाजवत म्हणाले…
corona : कोरोनाची अचूक भविष्यवाणी करणाऱ्या IIT कानपूरच्या प्राध्यापकाचे मोठे वक्तव्य; म्हणाले, भारतात लाॅकडाऊन…
shivsena  : एकनाथ शिंदेंची मोठी खेळी, संजय राऊतांना जामीन मिळवून देणाऱ्या नेत्यालाच घेतलं आपल्या गटात

ताज्या बातम्या बाॅलीवुड राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now