Share

politics: एकनाथ खडसेंचा मुलगा निखीलची आत्महत्या की हत्या? महाजनांचा धक्कादायक गौप्यस्फोट

Girish Mahajan

politics | राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे  (Eknath Khadse) आणि भाजपचे आमदार गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या शाब्दिक युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही. एकनाथ खडसे यांनी नुकतीच महाजनांवर त्यांना मुलगा नाही, अशी टीका केली होती. एकनाथ खडसेंना त्यांच्याच भाषेत उत्तर देताना गिरीश महाजन यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे.

गिरीश महाजन म्हणाले की, एकनाथ खडसेंच्या मुलाने आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली, याचा तपास व्हायला हवा. ते सोमवारी जळगावात माध्यमांशी बोलत होते. यावेळी गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंचे भिंग फूटणार असल्याचे सांगितले.

खडसेंवर टीका करत मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंना मुलाच्या मृत्यूची आठवण करून देत त्यांच्यावर हल्लाबोल केला. एकनाथ खडसेंवर प्रश्न उपस्थित करत गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंच्या मुलाची हत्या झाली की त्यांनी आत्महत्या केली, असा सवाल केला. तसेच, खडसेंच्या मुलाच्या मृत्यूची चौकशी होण्याची गरज आहे. मला जास्त बोलायला लावू नका, असेही ते म्हणाले.

यादरम्यान, एकनाथ खडसे यांनी खोचक शब्दात गिरीश महाजन यांना प्रतिउत्तर दिले आहे. ते म्हणाले की, “इतकं खालच्या पातळीवरच राजकारण मी कधीही केलं नाही. हा रक्ताचा दोष असू शकतो. मी संस्कारांमध्ये घडलेला माणूस आहे. गिरीश भाऊंना मुलगा नसल्यामुळे मुलगा गेल्याचं दु:ख त्यांना कदाचित समजणार नाही.”

तसेच, कोणाला माझ्या मुलाच्या मृत्यूवर संशय असेल तर त्यांनी सीबीआय चौकशी करायला हरकत नाही. माझ्या सगळ्या चौकश्या झाल्या आहेत. त्यामुळे मुलाची सीबीआय चौकशी करायला अडचण नाही, ते सत्तेत आहेत’, असे म्हणत खुले आव्हान खडसे यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-
Tamilnadu : तामिळनाडूच्या संघाने केला वनडेमध्ये विश्वविक्रम, तब्बल ५०० धावा ठोकत इंग्लंडला टाकले मागे 
Big Boss Marathi : किरण माने घराबाहेर पडताच विकास सावंतची पलटी? अपुर्वा नेमळेकरशी सलगी करत तोंडात भरवला घास
BCCI ने रोहीतला सांगीतले ;आम्ही ट्वेंटीसाठी नवा कर्णधार निवडतोय’ रोहित उत्तर देत म्हणाला

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now