cricket: माऊंट माँगनुई येथे खेळल्या गेलेल्या टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने ६५ धावांनी मोठा विजय नोंदवला. सूर्यकुमार यादव आणि दीपक हुडा विजयाचे नायक ठरले. टीम इंडियासाठी प्रथम फलंदाजी करताना सूर्यकुमार यादवने ५१ चेंडूत नाबाद १११ धावांची खेळी केली.
लक्ष्याचा बचाव करताना दीपक हुडाने सर्वाधिक चार बळी घेतले. युजवेंद्र चहल आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. सूर्याने आपल्या खेळीत ११ चौकार आणि ७ षटकार मारले. रोहित शर्मानंतर एका वर्षात दोन टी-२० शतके करणारा तो दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे.
या दणदणीत पराभवानंतर न्युझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनेही सुर्यकांत यादवचे कौतुक केले आहे. केन विलियम्स म्हणाला, सुर्याच्या आजच्या इनिंगला जगात तोड नाही. ही मी बघितलेली सर्वात उत्तम खेळी होती. सुर्या हा जगातील सर्वोत्तम खेळाडू आहे. भारताने चांगली कामगिरी केली.
दरम्यान, दुसऱ्या टि-२० सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने २० षटकात ६ गडी गमावून१९१धावा केल्या. प्रत्युत्तरात खेळण्यासाठी मैदानात उतरलेला न्यूझीलंड संघ आधीच दडपणाखाली होता. भारतीय गोलंदाजांनी स्विंगच्या मदतीने पॉवरप्लेमध्ये किवी फलंदाजांना बांधून ठेवले.
अखेर यजमानांचा डाव १२६ धावांवर आटोपला. अशाप्रकारे टीम इंडियाने हा सामना ६५ धावांनी जिंकून मालिकेतही आघाडी घेतली आहे. आता मालिकेत आणखी एक सामना बाकी आहे. त्याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
महत्वाच्या बातम्या –






