Share

SID ने दोन महिन्यांपुर्वीच सरकारला दिली होती एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीची पुर्वकल्पना, पण…

राज्याच्या राजकारणात सध्या काय चालू आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. सध्या उद्धव ठाकरे सरकार कोसळण्याच्या मार्गावर आहे. पण याची कल्पना आधीच उद्धव ठाकरेंना देण्यात आली होती अशी माहिती समोर आली आहे. राज्य गुप्तचर विभागाने म्हणजे एसआयडीने महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार याची कल्पना आधीच सरकारला दिली होती.

परंतु त्यावर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. ही माहिती महाराष्ट्र पोलिसांच्या सुत्रांनी दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे ८ ते १० आमदार आधीच विरोधी पक्षाच्या संपर्कात होते. ही माहिती दोन महिन्यांपुर्वीच एसआयडीने दिली होती. एसआयटीचं ते कामच आहे.

राज्यातील होणाऱ्या घडामोडींवर लक्ष ठेवणं, राजकीय घडामोडी आणि हालचालींवर लक्ष ठेवणं, गुन्हे तसेच दहशतवादी आणि माओवादी कारवायांबद्दल आधीच माहिती देणे हे काम एसआयटी पार पाडते. एसआयटीची स्थापना महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी करण्यात आली होती.

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार राजकीय घडामोडींची माहिती नेहमी तोंडी स्वरूपात सरकारला दिली जाते. पण एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीबद्दल सरकारला कल्पना असूनही त्यांनी काहीच पाऊले उचलली नाहीत. एसआयडीच्या मदतीने सरकारने काहीतरी पाऊले उचलायला पाहिजे होती.

अनेकवेळा राजकारण्यांचे सुरक्षारक्षक असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांकडून राज्य पोलिसांना राजकीय घडामोडींबद्दल गुप्त माहिती मिळत असते. दरम्यान, काल शिवसेनेचे दोन नेते मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी सुरतला गेले होते. शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे.

यादरम्यान महाविकास आघाडी सरकारमधील कृषिमंत्री दादा भुसे एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले जात आहे. कृषिमंत्री दादा भुसे यांचे शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याशी चांगले संबंध आहेत. कृषिमंत्री दादा भुसे नेहमीच एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असतात. त्यामुळे कृषिमंत्री दादा भुसे एकनाथ शिंदे यांची बंडखोरी निवाळण्यासाठी चर्चा करणार असल्याचे सांगितले जात आहे. कृषिमंत्री दादा भुसे यांना एकनाथ शिंदे यांनी अनेकवेळा मदत केली आहे.

महत्वाच्या बातम्या
पाकिस्तानने नुपूर शर्माचा मुद्दा संयुक्त राष्ट्रात उकरून काढला, भारताने ‘अशी’ केली बोलती बंद
शरद पवारांनाही भेटीसाठी वेळ देत नव्हते उद्धव ठाकरे, त्यानंतर शरद पवारांनी दिला होता ‘हा’ इशारा
२३ वर्षीय अभिनेत्रीने पंख्याला लटकून घेतला गळफास, ‘या’ व्यक्तीसोबत राहत होती लिव्ह इनमध्ये
शिंदे गटाला किती आमदारांचं किती समर्थन? बच्चू कडूंनी सांगीतला नेमका आकडा

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now