Share

मोठी बातमी! राजकारणात कोरोनाची एन्ट्री, उद्धव ठाकरेंनाही कोरोनाची लागण 

राजकीय वर्तुळात राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. एकीकडे विधान परिषदेच्या निकालानंतर शिंदे यांनी बंड केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. तर दुसरीकडे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे.

सध्या घडणाऱ्या राजकीय घडामोडींमध्ये राज्यपालांची भूमिका ही महत्त्वाची असणार आहे. मात्र असे असतानाच राज्यपालांना झालेली कोरोनाची लागण चर्चेचा विषय बनला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यपालांना आज सकाळी 9.15 वाजण्याच्या सुमारास गिरगाव येथील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सध्या राज्यपालांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर दुसरीकडे एक मोठी बातमी समोर आली आहे. उद्धव ठाकरेंनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. आधी वड्डेटीवार यांनी उद्धव ठाकरेंना कोरोना झाल्याची माहिती दिली होती. पण नंतर ते म्हणाले की, मला राज्यपालांना कोरोना झाला असं म्हणायचं होतं.

त्यानंतर पुन्हा नाना पटोले यांनी उद्धव ठाकरेंना कोरोना झाल्याची माहिती दिली. १ वाजता जी बैठक पार पडणार होती ती व्हरच्युअल पार पडणार आहे अशी माहिती नाना पटोले यांनी दिली. उद्धव ठाकरेंची ऍंटीजेन टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. पण त्यांना कोरोना झालाय की नाही यामध्येही गोंधळ झालेला पाहायला मिळाला.

सुरतमुक्कामी असलेले एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे नेमके किती आमदार आहेत, याबाबत मंगळवारी सकाळपासून विविध आकडे सांगितले जात होते. प्रत्येकजण आपापली आकडेवारी सांगत आहेत. मात्र आता एकनाथ शिंदे यांनी स्वतः माध्यमांशी बोलताना आपल्यासोबत एकूण किती आमदार आहेत, याबाबत खुलासा केला आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले, माझ्यासोबत ४० शिवसेनेचे आमदार आहेत. आणखी १० आमदार येणार आहेत असे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे खळबळ माजली आहे. आता उद्धव ठाकरेंना कोरोनाची लागण झाल्याने पुन्हा नेमकं पुढं काय होईल? उद्धव ठाकरे काय निर्णय घेतील? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

महत्वाच्या बातम्या
शिंदेच्या तावडीतून अक्षरश पळालेले आमदार कैलास पाटील मुख्यमंत्री ठाकरेंसमोर ढसाढसा रडले…
शिवसेनेला आणखी एक धक्का! ठाकरेंचा विश्वासू मंत्री शिंदेंना सामील, गुवाहाटीला रवाना
मंत्री बच्चू कडूंचा मोठा गौप्यस्फोट! मी स्वत: मुख्यमंत्र्यांना फोन केला होता, ते म्हणाले…
गुजरातच्या भूमीवरून फडफड करणाऱ्यांनो, महाराष्ट्रात तलवारीस तलवार…; सेनेचा बंडखोरांना निर्वाणीचा इशारा

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now