प्रेमासाठी माणूस काय-काय करत नाही आणि प्रेम वाचवण्याची गोष्ट असेल तर अनेक वेळा माणूस आपल्या मर्यादा ओलांडतो आणि याचे नुकतेच उदाहरण टीव्हीवरील प्रसिद्ध जोडप्याने दिले आहे. वास्तविक, टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक, दीप्ती ध्यानी (Deepti Dhyani) आणि सूरज थापर (Suraj Thapar) यांनी प्रेमाबद्दलच एक नव उदाहरण सेट केलं आहे.(Deepti Dhyani, Suraj Thapar, TV Industry, Bald)
खरंतर, दीप्ती ध्यानीने तिच्या पतीसाठी डोक्यावरचे सर्व केस काढले आहेत आणि याचे कारण जाणून तुम्हीही म्हणाल, खरे प्रेम अस असत. खरं तर, दीप्तीने तिचे केस सूरज थापरच्या आरोग्यासाठी समर्पित केले आहेत. ही गोष्ट आता चाहत्यांसह सर्वांच्या हृदयाला भिडली आहे. अनेकजण त्यांच्या प्रेमाबद्दल बोलताना दिसत आहेत आणि कौतुकही करत आहेत.
तुम्हाला आठवत असेल, कोरोनाच्या दुसर्या लाटेत अभिनेता सूरज थापर खूप गंभीर होता आणि त्यांच्या फुफ्फुसांना सुमारे ७० टक्के इन्फेक्शन झाले होते आणि तो अनेक दिवस आयसीयूमध्ये होता. अशा स्थितीत दीप्तीने नवस केला होता की जर सर्व काही ठीक झाल तर ती तिचे केस तिरुपती बालाजीमध्ये अर्पण करेल. अशा स्थितीत सर्व काही ठीक झाल्यानंतर तिने तिरुपतीला जाऊन आपले केस अर्पण केले. अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर केस नसलेल्या (टक्कल) अवतारातील एक फोटो शेअर केला आहे. याला कॅप्शन दिले आहे, ‘तेरे नाम @soorajthapar’
अभिनेता सूरजने स्वतः सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून ही माहिती दिली आहे. त्याने आपल्या पत्नीचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला दीप्ती ध्यानी तिच्या लांब केसांमध्ये दिसत आहे. काही वेळानंतर दुसऱ्या क्लिपमध्ये ती केस नसताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत सूरजने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘परिवर्तन… हे खरे प्रेम आहे. शुद्ध प्रेम. जगात इतर कोणीही तुमच्यासाठी असे करत नाही.
दीप्ती ध्यानीचे हे फोटो पाहिल्यानंतर चाहतेही तिची जोरदार प्रशंसा करत आहेत. एका यूजरने आपली प्रतिक्रिया देत लिहिले, तुम्ही खूप ग्रेट आहात मॅडम, तर दुसऱ्याने लिहिले, एक महान महिला, एक सच्चा प्रियकर, शुद्ध अंतःकरणाने, नेहमी आनंदी रहा. त्याचप्रमाणे इतर चाहतेही प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत.
आम्ही तुम्हाला सांगतो की दीप्ती ध्यान स्वतः देखील एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. तिने चंद्रगुप्त मौर्य, माता की चौकी, कैरी रिश्ता खट्टा मीठा यांसारख्या टीव्ही शोमध्ये काम केले आहे. तसेच सुरज थापरबद्दल बोलायचे झाले तर त्याने चंद्रगुप्त मौर्य, रजिया सुल्तान, एक नई पहचान, ससुराल गेंदा फुल, तेनाली राम अशा अनेक सिरीयलमध्ये काम केले आहे. सुरज थापर सध्या मित या पाॅपुलर सिरीयलमध्ये काम करत आहे.
महत्वाच्या बातम्या-
जेलमध्येही चमकला सुरज! खुनाच्या आरोपाखाली झाली अटक, अभ्यास करून क्रँक केली IIT परिक्षा
टिकटॉक स्टार सुरज चव्हाणची ‘सैराट’ भरारी; मराठी चित्रपटात हिरो म्हणून झळकणार
भाजपात सदाभाऊंची अवस्था नटरंगासारखी; राष्ट्रवादीने पुन्हा डिवचल