Share

सत्ता पाहिजे ना मी तुमच्यासोबत येतो, पण…; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भाजपला थेट ऑफर

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भाजप नेते शिवसेनेवर आरोप करताना दिसत आहे. तसेच अनेकवेळा भाजपने शिवसेनेला ऑफर दिल्याचेही समोर आले आहे. पण आत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला सत्तेसाठी एक आव्हानच दिले आहे. (cm uddhav thackeray angry on bjp)

तुम्ही जे चाळे केलेत. कुटुंबीयांची बदनामी करताय ना. आम्ही तुमच्या कुटुंबाची बदनामी केली का? सत्ता हवीये ना मी येतो तुमच्यासोबत एवढाच तुमचा जीव जळत असेल तर मला टाका तुरुंगात, मर्द असाल तर मर्दासारखे लढा, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावलं आहे.

आम्ही सगळे भ्रष्टाचारी आहोत, दाऊदची माणसं आहोत. मग सकाळच्या सत्तेचा प्रयत्न सफल झाला असता, तर नवाब मलिक, अनिल देशमुख तुमच्या मांडीला मांडी लावून बसले नसते का? आम्ही तुमच्या कुटुंबाला काही बोललो नाही तरी आमच्या कुटुंबाची बदनामी करता जी नीच आणि निंदनीय आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

तसेच मर्द असाल, तर मर्दासारखे अंगावर येऊन लढा. सत्तेचा दुरुपयोग करुन समोर येतात. शीखंडीला लढण्याची ताकद नव्हती, त्याला मध्ये टाकलं. आता शीखंडी कोण आहे आणि मर्द कोण आहे? हेच कळत नाही. कोण कुणाच्या मागून लढत आहे, हेच कळत नाही. हिंमत असेल तर समोरसमोर या. नामर्दासारखे लढू नका, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

हा महाराष्ट्र आहे, धृतराष्ट्र नाही. मी घाबरलो म्हणून बोलत नाही, यातून काहीच होणार नाही. ही संधी आहे. संधीचं सोनं करण्याचे काम आहे. कोणत्या सूचना असतील तर सांगा कोण गुन्हेगार असेल तर सांगा आम्ही कारवाई करु, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

तसेच तुम्हाला सत्ता हवीये ना, चला सगळ्यांसमोर सांगतो मी तुमच्यासोबत येतो, मला तुरुंगात टाका, मी तयार आहे. माझ्याशी वाद आहे ना मग मला तुरुंगात टाका. तुमच्या कुटुंबाची कोणी बदनामी केली का? तुम्ही आमच्या कुटुंबाची बदनामी करता जी नीच आणि निंदनीय गोष्ट आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
‘आमदाराकडे किती संपत्ती असते, ते मला चांगलंच माहितीये’ आमदारांना घरं देण्यावरून करुणा मुंडेंनी केली योजनेची पोलखोल
बहुतांश आमदार गरीब त्यामुळे त्यांना मुंबईत घरे मिळालीच पाहीजेत; शिवसेना खासदाराचे वक्तव्य
‘आता हे राज्य राहण्यायोग्य राहिलं नाही…’ हिंसाचाराची आठवण करून देताना भाजप खासदाराला कोसळलं रडू

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now