Share

शिवाजी महाराजांची ‘ही’ मंदिरे तुम्हाला माहित व्हायलाच पाहीजेत? एक तर राजाराम महाराजांनी बांधलेय

काही माणसे जन्मास येताना माणूस म्हणून जरी जन्माला आली तरी, जाताना त्यांना दैवत्व बहाल केले जाते. छत्रपती शिवाजी महाराज (chatrapati shivaji maharaj) हेही यातीलच एक उदाहरण आहेत.

आपल्या पराक्रमाच्या जोरावरती छत्रपती शिवाजी महाराजांनीही दैवत्व सिद्ध करून दाखवले होते. ज्या माणसाने आयुष्यभर गड-किल्ले आणि रयतेच्या सुखाचा विचार केला, त्याच छत्रपती शिवाजी महाराजांना आज प्रत्येक जण देव मानून देव्हाऱ्यात पूजतो आहे.

आज छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव जरी घेतले तरी, आपोआपच आपण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ही उपमा जोडतो.

मात्र माणूस म्हणून जन्मास येऊन ही ज्यांनी आपल्या पराक्रमावरती देवासमान दर्जा प्राप्त केला, आणि आपले स्थान मंदिरात ही निर्माण केले, अशा छत्रपती शिवरायांच्या भारतातील वेगवेगळ्या मंदिराविषयी अपरिचित माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

१६९५ साली खुद्द राजाराम महाराजांनी किल्ले सिंधुदुर्गवर छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर बांधून त्याला श्री शिवराज्येश्वर मंदिर असे नाव दिले होते.

अहमदनर येथील पारनेरकर महाराजांनी देशभरात छत्रपती शिवाजी महाराजांची १ हजार मंदिरे स्थापन्याचा संकल्प केला होता. या संकल्पनेतूनच १७ वर्षांपूर्वी मंदिरांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकला छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर बांधण्याचा मान मिळाला होता.

या ही पुढे जाऊन सांगायचे झाले तर, आंध्र प्रदेशच्या श्रीशैलममध्येही छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर आहे. या मंदिरात शिवाजी महाराजांचे जीवनचरित्र भिंतींवर लावण्यात आले आहे.

१९८३ साली महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या हस्ते या केंद्राचं भूमिपूजन करून, संपूर्ण ब्रॉन्झचा पुतळा याठिकाणी बसवण्यात आला होता. तसेच इथे शिवाजी महाराज अतिथी केंद्रही उभारण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या
जय शिवराय! देवरूखात अवघ्या ३ सेंटिमीटरमध्ये साकारले शिवराय; पठ्ठ्याने केला विश्वविक्रम
छत्रपती शिवाजी महाराजांकडे ७ घोडे होते, त्यांची नावे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या..
करीना कपूर तिसऱ्यांदा प्रेग्नेंट? व्हायरल व्हिडीओमुळे चर्चांना उधाण, युजर्स म्हणाले, बेबोला पुन्हा..
करीना कपूर तिसऱ्यांदा प्रेग्नेंट? व्हायरल व्हिडीओमुळे चर्चांना उधाण, युजर्स म्हणाले, बेबोला पुन्हा..

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now