दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा आगामी चित्रपट ‘नाय वरणभात लोन्चा कोन नाय कोन्चा’ हा चित्रपट १४ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. मात्र, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच हा चित्रपट वादात अडकला होता. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील काही दृश्यांमुळे काही लोकांनी आक्षेप घेतला. यादरम्यान या प्रकरणावर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कामगार सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
अमेय खोपकर यांनी यासंदर्भात फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी लिहिले की, ‘नाय वरणभात लोन्चा, कोण नाय कोन्चा’ या मराठी चित्रपटावरुन जो वाद सुरु आहे, त्यात महेश मांजरेकर यांच्यावर वैयक्तिक स्वरुपाची अश्लाघ्य टीका करणाऱ्यांचा मी अग्रक्रमाने निषेध करतो.
‘महेश मांजरेकर हे मराठी चित्रपटसृष्टीचे आधारस्तंभ आहेत. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘नाय वरणभात लोन्चा, कोण नाय कोन्चा’ या चित्रपटाबद्दल जे काही बोलायचं असेल ते चित्रपट बघून ठरवा’.
‘पूर्वग्रहदूषित ‘सडकी’ शेरेबाजी करणाऱ्यांनो, आपला मेंदू किती सडलेला आहे हेच तुम्ही जगाला ओरडून सांगताय. मी चित्रपट बघून लवकरच पुन्हा बोलेनच’, असे अमेय खोपकर यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, ‘नाय वरणभात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ या चित्रपटाचा ट्रेलर १० जानेवारी रोजी प्रदर्शित करण्यात आला होता. मात्र, या चित्रपटात अनेक बोल्ड आणि आक्षेपार्ह दृश्यांवरून महिला आयोगाने केंद्रिय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे तक्रार दाखल केली होती. तसेच हे आक्षेपार्ह दृश्य चित्रपटातून वगळण्याची त्यांनी मागणी केली. त्यानंतर चित्रपटाचा ट्रेलर युट्यूबसह सर्व सोशल मीडियावरून हटविण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या :
‘मांजरेकर हे मराठी चित्रपटसृष्टीचे आधारस्तंभ, जे काही बोलायचं असेल ते चित्रपट बघून ठरवा’
सेटवर फोन उचलल्याने दिग्दर्शकाने मारलं; प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा
अभिनेते किरण मानेंनी घेतली थेट शरद पवारांची भेट; राजकीय वर्तुळात उडाली खळबळ