Homeताज्या बातम्यासेटवर फोन उचलल्याने दिग्दर्शकाने मारलं; प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा

सेटवर फोन उचलल्याने दिग्दर्शकाने मारलं; प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा

मनोरंजन विश्वात कास्टिंग काऊच, शारीरिक आणि मानसिक छळाचे अनेक गंभीर प्रकरणे समोर येत आहे. दिग्दर्शकाच्या आणि निर्मात्याच्या विचित्र मागण्यांमुळे अभिनेत्रीही त्रासून जात असतात. याप्रकरणी अनेक अभिनेत्रींनी उघडपणे बोलायला सुरुवात केली आहे.

अशात प्रसिद्धी टीव्ही अभिनेत्री मृणालिणी जांभळे हिने काही वर्षांपूर्वी तिच्यासोबत घडलेल्या घटनेविषयी खुलासा केला आहे. नुकत्यात दिलेल्या एका मुलाखतीत तिने आपल्यासोबत घडलेला भयानक प्रकार सांगतला आहे. दिग्दर्शकाने तिचा कसा छळ केला होता आणि आजही नवीन अभिनेत्रींसोबत कसा छळ केला जातो याबाबत तिने सांगितले आहे.

काही वर्षांपूर्वी मी एका टीव्ही शोचा भाग होते. त्या आठवणी किंवा प्रसंग आजही आठवावेसे आठवत नाही, पण अन्नापूर्णा ताई स्वाती भादवेसारख्या अभिनेत्रींनी आपल्या बाजू मांडल्या आहेत आणि याबद्दल मोकळेपणाने बोलले आहे. तर मग मी का नाही? असा प्रश्न मला पडतोय असे मृणालिणी जांभळेने म्हटले आहे.

काही वर्षांपूर्वी माझ्यासोबत धक्कादायक घटना घडल्या असल्यातरी त्याचा अर्थ असा नाही की मी ते विसरले आहे. जेव्हा जेव्हा एखाद्या अभिनेत्रीला अशा त्रासाला सामोरं जावं लागतं, तेव्हा माझ्यासोबत घडलेल्या सर्व गोष्टी मला अजूनही आठवतात, असेही मृणालिनी जांभळेने म्हटले आहे.

मी एक टीव्ही सिरियल करत होते, तेव्हा एक दिग्दर्शक मला नेहमी छळत असायचा. तो आधी सहाय्यक होता, पण नंतर तो दिग्दर्शक झाला. तो माझ्या केसांविषयी माझ्या भाषेविषयी टिप्पणी करायचा. इंग्रजीत काही संवाद होते आणि मला इंग्रजी नीट येत नसल्यामुळे तो माझी बदनामी करु लागला. मला इंग्रजी नीट येत नसल्यामुळे तो माझा अपमान आणि अनादर करु लागला, असे मृणालिनी म्हटले आहे.

तसेच आम्ही एका दृष्यासाठी शुटींग करत होतो आणि त्यासाठी तयारी सुरु होती. सहसा मी शुटींगदरम्यान कधीही फोन उचलत नाही, पण त्यादिवशी मला कॉल उचलावासा वाटला. फोन उचलताच त्याने ओरडून फोन खाली ठेवण्यास सांगितले. नंतर तो माझ्याजवळ आला आणि त्याने माझ्या डोक्यावर मारलं. काही जेष्ठ कलाकारांशिवाय कोणीही त्यावेळी हस्तक्षेप केला नाही, असे मृणालिनीने म्हटले आहे.

माझ्यावर हा उचलल्यानंतर आमचं भांडण झालं. मी खुप चांगली अभिनेत्री आहे, असे म्हणत नाही. पण प्रत्येक अभिनेत्याला सन्मानाने वागवलं पाहिजे, असं मला वाटतं, अशा शब्दांमध्ये अभिनेत्री मृणालिणीने आपले दु:ख व्यक्त केले आहे.

तसेच या घटनेनंतर मी शोच्या संचालकाविरुद्ध तक्रार दाखल केली. शोच्या निर्मात्यांनी त्याला हाकलून दिलं. मी अजूनही तिथेच काम करत होते. कारण माझ्यानंतर अनेकजणी तिथे येऊन बोलल्या. अशा घटना थांबल्या पाहिजे. नवोदित कलाकार अशा घटना सांगण्यापासून टाळतात, पण त्यांनी समोर येऊन व्यक्त झालं पाहिजे, असे मृणालिणीने म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
‘मांजरेकर हे मराठी चित्रपटसृष्टीचे आधारस्तंभ, जे काही बोलायचं असेल ते चित्रपट बघून ठरवा’
‘सिनेमा झाला आणि ही पोरगी आपली एकदम झक्कास मैत्रीण झाली’, विजू मानेंची पोस्ट चर्चेत
सारेगमप लिटिल चॅम्पमधील ‘हा’ गायक लवकरच आपल्या प्रेयसीसोबत करणार लग्न

ताज्या बातम्या