Share

‘बिग बॉस’ फेम सोनाली पाटीलचे इन्स्टाग्रामवर झाले २००K फॉलोअर्स; पोस्ट शेअर करत चाहत्यांचे मानले आभार

बिग बॉस मराठीचा तिसरा पर्व नुकताच संपन्न झाला. या शोमधील प्रत्येक स्पर्धकाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत त्यांचे लक्ष वेधून घेतले होते. या शोमधील एक स्पर्धक सोनाली पाटीलनेही आपल्या स्वभावाद्वारे सर्वांची मने जिंकून घेतली होती. बिग बॉस शो संपल्यानंतरही सोनाली फारच चर्चेत आहे. नुकतीच तिने तिच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. काय आहे ती बातमी जाणून घेऊया.

सोनाली पाटील सोशल मीडियावर फारच सक्रिय असते. याद्वारे ती तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांशी शेअर करत असते. तिच्या या पोस्ट्सना चाहत्यांचीही खूप पसंती मिळत असते. नुकतीच सोनालीचे इन्स्टाग्रामवर २ लाख फॉलोअर्स झाले आहेत. याबाबत सोनालीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.

सोनालीने इन्स्टाग्रामवर तिचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने इन्स्टाग्रामवर तिचे २ लाख फॉलोअर्स झाल्याचे सांगितले. तसेच कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘लई थँक्यू अॅन्ड लई लव्ह यू २००K इन्स्टाग्राम फॅमिली. यासोबत सोनालीने #Sonali Patil #200K #followers असे हॅशटॅगही वापरले आहेत’.

सोनाली पाटीलला ‘बिग बॉस’ शोमुळे खूप लोकप्रियता मिळाली. पण त्याआधीही ती छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने ‘जुळता जुळता जुळतंय की’, ‘देवमाणूस’, ‘वैजू नंबर १’ यासारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. ‘वैजू नंबर १’ या मालिकेतील वैजयंती या भूमिकेद्वारे ती घराघरात पोहोचली. तसेच देवमाणूस मालिकेतील ‘आर्या पाटील’ या तिच्या भूमिकेलाही प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती.

दरम्यान, ‘देवमाणूस २’ या मालिकेत पुन्हा सोनाली पाहायला मिळणार का? असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जात आहे. चाहते सोनालीला पुन्हा एकदा मालिकेत पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. तर लवकरच सोनालीही नव्या भूमिकेद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करेल अशी अपेक्षा आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

रोहनमसोबतच्या ब्रेकअपबाबत सुष्मिताचा मोठा खुलासा, म्हणाली, ‘मी माझे आयुष्य उद्ध्वस्त केले’

‘शमिताला वोट करा यावेळी ती जिंकलीच पाहिजे’, शिल्पा शेट्टीचा ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल

करण जोहरने दिल्ली सरकारकडे केली ‘ही’ विनंती, नेटकरी म्हणाले, ‘काहीही फालतू बोलू नको’
VIDEO: बिग बॉस विनर विशाल निकमने दिलेले वचन केले पुर्ण, शिवलीला पाटील यांची भेट घेत म्हणाला..

मनोरंजन

Join WhatsApp

Join Now