Homeताज्या बातम्याकरण जोहरने दिल्ली सरकारकडे केली 'ही' विनंती, नेटकरी म्हणाले, 'काहीही फालतू बोलू...

करण जोहरने दिल्ली सरकारकडे केली ‘ही’ विनंती, नेटकरी म्हणाले, ‘काहीही फालतू बोलू नको’

देशात कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी वेगवेगळे निर्बंध लावण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीतही अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यानुसार २८ डिसेंबरपासून दिल्लीतील सर्व सिनेमागृह बंद करण्यात आली आहेत. अशात बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहरने दिल्ली सरकारकडे सिनेमागृह सुरु करण्याची विनंती केली आहे.

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेवेळे कोरोनामुळे लावण्यात आलेल्या निर्बंधामुळे सिनेमागृह आणि चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान झाले होते. तसेच आताही नवीन निर्बंधामुळे यो दोन्ही इंडस्ट्रीना खूप नुकसान सहन करावे लागत आहे.

या निर्बंधामुळे नुकतीच प्रदर्शित झालेल्या रणवीर सिंहच्या ‘८३’ चित्रपटाच्या कमाईवर परिणाम झाला आहे. ही परिस्थिती पाहता अनेक चित्रपटांचे प्रदर्शनही पुढे ढकलण्यात येत आहे. नुकतीच शाहीद कपूरच्या ‘जर्सी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही पुढे ढकलण्यात आली आहे.

ही परिस्थिती पाहता मल्टीफ्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या सदस्यांद्वारे दिल्ली सरकारला एक निवेदन देत सिनेमागृह पुन्हा सुरु करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यानंतर दिग्दर्शक करण जोहरनेही एक ट्विट करत सिनेमागृह सुरु करण्याची विनंती केली आहे.

करण जोहरने ट्विटमध्ये म्हटले की, ‘आम्ही दिल्ली सरकारकडे सिनेमागृह सुरु करण्यासाठी परवानगी देण्याची विनंती करत आहोत. दुसऱ्या जागांच्या तुलनेत सिनेमागृहात सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची अधिक चांगली व्यवस्था करता येऊ शकते’.

करणच्या या ट्विटला दिल्ली सरकारकडून अद्याप काही उत्तर मिळाले नाही. मात्र, या ट्विटमुळे नेटकरी करणला ट्रोल करत आहेत. करणच्या ट्विटला रिट्विट करत एकाने लिहिले की, ‘जेणेकरून लोकांचे आरोग्य धोक्यात घालून तुम्ही पैसा कमवू शकाल हो ना. तसेच तुमच्याच इंडस्ट्रीतील काही लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे ना?’

दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, ‘तुम्ही खरंच हे इच्छित आहात का? तुम्ही स्वतः तुमच्या मुलांना आणि कुटुंबाला दररोज सिनेमागृहात का घेऊन जात नाही? तुम्हाला फक्त तुमच्या चित्रपटांची काळजी आहे. राष्ट्राच्या सुरक्षेबद्दल नाही. काही चांगलं बोलता येत नसेल तर निदान फालतू तरी बोलू नका’.

तसेच दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, ‘म्हणजे लोकांनी त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा जीव धोक्यात घालून चित्रपट पाहावे का ? यामुळे तुम्हाला पैसा मिळेल आणि त्यांना आजार’.

महत्त्वाच्या बातम्या : 

PHOTOS: जंगलाच्या मधोमध धबधब्यामध्ये अंघोळ करताना दिसली सामंथा, गोव्यात घेतेय सुट्टीचा आनंद

अल्पवयीन मुलीच्या पर्समध्ये आईला सापडल्या ‘या’ गोष्टी अन् उघडकीस आला बलात्काराचा गुन्हा
अक्षय कुमारने १५० कोटी घेऊन साईन केला चित्रपट; बनला सर्वात महागडा अभिनेता