Homeताज्या बातम्यारोहनमसोबतच्या ब्रेकअपबाबत सुष्मिताचा मोठा खुलासा, म्हणाली, 'मी माझे आयुष्य उद्ध्वस्त केले'

रोहनमसोबतच्या ब्रेकअपबाबत सुष्मिताचा मोठा खुलासा, म्हणाली, ‘मी माझे आयुष्य उद्ध्वस्त केले’

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने नुकतीच काही दिवसांपूर्वी बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबतच्या ब्रेकअपची बातमी दिली होती. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिने रोहमनसोबतचे नाते फार पूर्वीच संपले असून आता त्या दोघांमध्ये केवळ मैत्रीचे नाते असल्याचे सांगितले होते. मात्र, त्यांच्या ब्रेकअपमागचे कारण समोर आले नव्हते. यादरम्यान एका मुलाखतीत बोलताना सुष्मिताने रोहमनसोबतच्या ब्रेकअपबाबत खुलासा केला आहे.

हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत बोलताना सुष्मिताने सांगितले की, ‘जेव्हा एखादी व्यक्ती सेलिब्रिटी असते तेव्हा त्यांच्याशी संबंधित इतर व्यक्तीही लोकांच्या नजरेत येत असतात. ती व्यक्ती तिथे येते कारण तुम्ही त्यांना तिथे घेऊन येत असता. त्यामुळे ही गोष्ट त्या व्यक्तीसाठी आणि तुमच्यासाठीही योग्य नाही. तसेच तुम्ही रिलेशनशीपमध्ये आहात असा विचार करून तुम्ही एखाद्याच्या भावनांशी खेळणेही योग्य नाही’.

पुढे बोलताना सुष्मिताने सांगितले की, ‘दोघांसाठीही हे महत्त्वाचे आहे की, त्यांनी त्यांच्या आयुष्यात पुढे जावे. पण मैत्री कायम राहावी. या वयात मी अशा भयानक गोष्टींबद्दल विचार करत बसले तर खरोखरच मी माझे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे’.

सुष्मिता सेनला यावेळी विचारण्यात आले की, तिने रिलेशनशीपच्या माध्यमातून काय शिकले? यावर उत्तर देताना सुष्मिताने सांगितले की, तिने प्रत्येक रिलेशनपशीद्वारे खूप काही शिकत गेली. आणि ती एक सुंदर गोष्ट आहे’.

तिने म्हटले की, ‘मी जेव्हा प्रेम करते तेव्हा मी १०० टक्के प्रेम करते. त्याचप्रमाणे जेव्हा वेगळे होतो तेव्हा पूर्णपणे वेगळे झालो पाहिजे. आयुष्यात कोणताही रिपीट मोड नाही. तुमचे वेगळे होण्याचे कारण काहीही असले तरी तुमच्यातील मैत्री कायम राहते’.

सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल यांच्यात खूप वर्षांचे अंतर आहे. सुष्मिता रोहमनपेक्षा १५ वर्ष मोठी आहे. मात्र, या दोघांचे फोटो पाहून त्यांच्या वयाचा अंदाज लावता येत नाही. तसेच त्यांच्या वयाच्या अंतराचा त्यांच्या बॉन्डिंगवर कधी फरक पडला नाही.

रोहमन आणि सुष्मिताच्या जोडीला चाहत्यांकडून खूप पसंती दिले जात असत. तसेच दोघांच्या लग्नाच्याही बातम्या अनेकवेळा समोर आल्या होत्या. परंतु, जवळपास ४ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर सुष्मिता आणि रोहमन आता वेगळे झाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या :

अक्षय कुमारने चित्रपट साईन करण्यासाठी घेतले एवढे कोटी; बनला बॉलिवूडमधील सर्वात महागडा अभिनेता
लस घेतल्यानंतरही अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाची लागण; नोरा फतेहीसुद्धा कोरोनाच्या विळख्यात
आपल्या सर्वांची लाडकी स्कॉर्पियो येणार नवीन अवतारात, वाचा नवीन फिचर्स आणि किंमत