काझड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुलाने आपल्या जन्मदात्या आईचाच खुन केला आहे. जमीन वाटून देत नाही, मागेल तेवढे पैसै देत नाही आणि इत्यादी कारणांवरून त्याचा आईशी वाद झाला होता. त्यानंतर आईवर मुलाने लोखंडी कोयत्याने सपासप वार करून तिचा खुन केला.
इंदापुर तालुक्यातील काझड येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. तसेच यानंतरही तो मुलगा शांत बसला नाही त्याने त्याच कोयत्याने आपल्या वडिलांचाही खुन करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमध्ये त्याचे वडिलही गंभीर जखमी झाले असून त्यांच्या हाताची दोन बोटे तुटली आहेत.
याप्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी मुलावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. अलका पांडुरंग नरूटे असे खुन झालेल्या आईचे नाव आहे. त्यांचे वय ५५ वर्षे होते. या महिलेच्या डोक्यात तसेच अंगावर लोखंडी कोयत्याने सपासप वार करून तिचा खुन करण्यात आला.
या प्रकरणी ३१ वर्षीय अमित पांडुरंग नरूटे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचे वडिल पांडुरंग नरूटे यांनी वालचंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांडुरंग नरूटे यांची काझड परिसरामध्ये शेती व घर आहे.
रविवारी पहाटे एकच्या सुमारास अमितने आईला शेतात पंप चालू करायचा आहे असे सांगितले. त्याने आईलाही सोबत नेले होते. त्यानंतर उसाच्या शेतात सपासप कोयत्याने वार करून आईची निर्घुण हत्या केली. आईचा खुन केल्यानंतर वडिलांचाही खुन करण्यासाठी तो घरी आला.
त्याने वडिलांना सांगितले की शेतातील पाईप फुटला आहे तो जोडण्यासाठी आपण दोघे जाऊ. पण वडिलांना त्याच्यावर संशय आला आणि त्यांनी त्याच्यासोबत जाण्यास नकार दिला. त्यानंतर अमितने वडिलांच्या डाव्या हातावर कोयत्याने वार केला. वार केल्यानंतर पांडुरंग यांच्या दोन्ही हाताची बोटे तुटली.
या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बिरप्पा लातुरे यांनी ही माहिती दिली आहे. या घटनेने पुर्ण परिसर हादरला आहे. आरोपीला कडक शिक्षा व्हावी अशी मागणी काही नागरिक करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
VIDEO:‘त्या’ अभिनेत्रीला मिठी मारणे रितेशला पडले महागात, घरी गेल्यानंतर जेनेलियाने धु-धु धुतला
रोहनमसोबतच्या ब्रेकअपबाबत सुष्मिताचा मोठा खुलासा, म्हणाली, ‘मी माझे आयुष्य उद्ध्वस्त केले’
केंद्र सरकारची भन्नाट योजना, आता खात्यात जमा होणार महिन्याला ५ हजार ! ‘जाणून घ्या’ संपूर्ण माहिती






