Share

क्रिकेटमधून निवृत्ती घेताच भज्जीने केले मन मोकळे, धोनीवर गंभीर आरोप करत म्हणाला..

भारताचा माजी ऑफस्पिनर हरभजन सिंगने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. क्रिकेटला सोडचिठ्ठी दिल्यानंतर हरभजन सिंगने एकामागून एक धडाकेबाज खुलासे केले आहेत. हरभजन सिंगने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर गंभीर आरोप केले आहेत. हरभजन सिंगच्या म्हणण्यानुसार, त्याला कोणतेही कारण न देता टीम इंडियातून वगळण्यात आले होते.

2011 च्या विश्वचषकानंतर हरभजन सिंगने केवळ 10 वनडे आणि 10 कसोटी सामने खेळले होते. 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2015 च्या विश्वचषकासाठीही हरभजन सिंगला संघात स्थान देण्यात आले नव्हते. महेंद्रसिंग धोनीमुळे रविचंद्रन अश्विन टीम इंडियात दाखल झाला. रविचंद्रन अश्विनच्या आगमनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून हरभजन सिंगची कारकिर्द धोक्यात आली.

निवृत्तीनंतर हरभजन सिंगने आता आपला राग काढला आहे. हरभजन सिंग म्हणाला, ‘400 बळी घेणारा खेळाडू संघाच्या बाहेर कसा काय होऊ शकतो? ही एक रहस्यमय कथा आहे, जी अद्याप उघड झालेली नाही. मला अजूनही प्रश्न पडतो, ‘काय झालं? माझ्यामुळे संघात कोणाला अडचण होती?’

हरभजन सिंगने खुलासा केला की त्याने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला त्याला संघातून काढण्याचे कारण विचारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही. जाब विचारण्यात अर्थ नाही हे लक्षात येताच हरभजन सिंगने कारण विचारणे बंद केले. हरभजन सिंग म्हणाला, ‘मी कर्णधाराला विचारण्याचा प्रयत्न केला, पण मला कोणतेही कारण सांगण्यात आले नाही.

माझ्या लक्षात आले की यामागे कोण आहे आणि कारण विचारत काही अर्थ नाही. कारण तुम्ही विचारत आहात आणि कोणीही उत्तर दिले नाही तर ते सोडून दिलेले बरे, असे भज्जी म्हणाला. हरभजन सिंगने 1998 मध्ये चेन्नई येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यानंतर हरभजन सिंगने त्याच वर्षी न्यूझीलंडविरुद्ध वनडे पदार्पण केले.

2006 मध्ये हरभजन सिंगने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले. हरभजन सिंग 2016 पासून टीम इंडियातून बाहेर होता. मिळालेल्या माहितीनुसार तो कोणत्याही आयपीएल फ्रँचायझीचा सपोर्ट स्टाफ किंवा कोच बनू शकतो. मेगा लिलावात हरभजन सिंग कोणत्याही संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.

महत्वाच्या बातम्या
पैसा महत्वाचा का जीव? सहा हजार रुपये हरवले म्हणून २२ वर्षीय तरुणीने घेतला गळफास 
समीर वानखेडेंनी केले एनसीबीला बाय-बाय, १००० कोटींचे ड्रग्स जप्त ते सेलिब्रीटींना अटक; ‘असा’ होता कार्यकाळ
…तर उमेदवारांना MPSC च्या परीक्षेला बसता येणार नाही; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय
नारायण राणेंचा शिवसेनेला धोबीपछाड, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव

खेळ

Join WhatsApp

Join Now