Share

भाजपकडून फोडाफोडीला सुरवात; तीन बडे नेते शिवसेना आमदार ठेवलेल्या ट्रायडंटमध्ये घुसले

devendra fadnvis and uddhav thakare

सध्या राज्यातील राजकारण तापलेले आहे. ट्रायडंट हॉटेलमध्ये काहीतरी शिजतंय हे तरी नक्की आहे. एकीकडे शिवसेनेचे तीन आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपने केला होता तर दुसरीकडे एकापाठोपाठ एक भाजप नेते ट्रायडंटमध्ये  येत आहे. त्यामुळे शिवसेनेने भाजपचे आमदार फोडण्यास सुरूवात केली आहे असं बोललं जात आहे.

ट्रायडंटमध्ये सध्या शिवसेनेचे आमदार, अपक्ष आमदार हे मुक्कामी आहेत. भाजप नेते कृपाशंकर सिंह ट्रायडंटमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर अशा चर्चा आल्या होत्या की आता कृपा शंकर सिंह शिवसेनेच्या कोणत्या आमदाराला फोडणार? आता पुन्हा त्या चर्चांना उधाण आले आहे कारण पुन्हा कृपाशंकर पुन्हा ट्रायडंटमध्ये दाखल झाले आहे.

एका फॅमिली फंक्शनसाठी आलेले कृपाशंकर सिंह यांना वारंवार ट्रायडंटमध्ये पाहण्यात आलं आहे. हॉटेलच्या रुफ टॉपवर कार्यक्रमादरम्यान ते कोणत्या आमदारांना भेटले हे अद्याप समजलेले नाही. याबद्दल अनेक तर्क लावले जात आहेत. भाजपने दावा केला होता की, शिवसेनेला समर्थन देणारे तीन आमदार भाजपच्या संपर्कात आहेत.

तर दुसरीकडे एकापाठोपाठ एक भाजपचे आमदार ट्रायडंटमध्ये येत आहेत. यामुळे वातावरण तापलं आहे. महाविकास आघाडी आणि भाजप दोघांनीही आपला विजय झाल्याचे सांगितले आहे पण सत्य काय आहे हे लवकरच सगळ्यांना कळेल. कृपाशंकर सिंह यांना याबाबत विचारल्यावर ते म्हणाले की, मी एका फॅमिली फंक्शनसाठी आलेलो आहे.

शिवसेनेच्या आमदारांना भेटण्यासाठी मी आलेलो नाही. योगायोगाने जर आमदार भेटले तर त्यांना नमस्कार करेन आणि सांगेन आमचे उमेदवार महाडिकांना मतदान करा, असा खोचक टोला त्यांनी यावेळी लगावला. शिवसेना आमदारांना ठेवण्यात हॉटेलमध्येच महाडिक काल रात्रीपासून होते, अशी हैराण करणारी माहिती समोर आली आहे.

त्यांचा व्हिडिओही समोर आला आहे. भाजप उमेदवार शिवसेना आमदारांच्या हॉटेलमध्ये काय करतोय? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. शिवसेना आमदारांना ठेवण्यात आलेल्या हॉटेल ट्रायडंटमध्ये गेल्या दोन दिवसांपासून बैठका सुरु आहे. तसेच महाविकास आघाडीचे नेते देखील या बैठकांना उपस्थित राहताना दिसत आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या हॉटेलमध्ये सर्वपक्षीय आमदारांची एक बैठकही घेतली होती.

दरम्यान, बुधवारी भाजप नेते आशिष शेलारही ट्रायडंटमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर चर्चांना उधाण आले होते. त्यांनी सुरवातीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर ते म्हणाले की, मनसे राज्यसभा निवडणुकीत भाजपला पाठिंबा देणार आहे. राज ठाकरेंसोबत बैठक झाल्यानंतर ते थेट ट्रायडंटमध्ये दाखल झाले. याबाबत विचारले असता ते म्हणाले की, फक्त चहा घेण्यासाठी आणि मुक्कामी असलेल्या व्यक्तींना  भेटण्यासाठी मी तेथे गेलो होतो.

महत्वाच्या बातम्या
मलिक, देशमुखांना राज्यसभेला मतदान करता येणार का? कोर्टाने दिला हा निर्णय
इन्स्टावर २० कोटी फॉलोवर्स असलेला विराट एकटाच क्रिकेटपटू, एका पोस्टसाठी घेतो ‘तब्बल’ एवढे कोटी
साऊथची सर्वात महागडी अभिनेत्री नयनतारा विग्नेशसोबत अडकली लग्नबंधनात, पहा लग्नाचे सुंदर फोटो
VIDEO: ब्रेस्ट कॅन्सर झाल्यानंतर महिमा चौधरीने ढसाढसा रडत सांगितली तिची कहाणी, पाहून व्हाल भावूक

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now