आगामी काळात राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता आहे. आमदार बच्चू कडू यांनी हे संकेत दिले आहे. आगामी काळात होणाऱ्या राजकीय घडामोडींवर बच्चू कडू यांनी धक्कादायक विधान केलं आहे. अनेक आमदार शिंदे गटात सामील होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आगामी काळात ठाकरे गट वगळता १० ते १५ आमदारांचा शिंदे प्रवेश होणार असल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील आगामी काळातील घडामोडींचा फक्त राज्याच्या राजकारणावर नाही तर संपुर्ण देशाच्या राजकारणावर परिणाम होणार आहे.
ठाकरे गट वगळला आगामी काळात पक्षातील १०-१५ आमदार शिंदे गटात येऊ शकतात. २०-२५ आमदार जरी इतके तिकडे झाले तरी सरकार आपला काळ पुर्ण करेल,असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. एकप्रकारे त्यांनी शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार नाही, असेच म्हटले आहे.
तसेच हा पक्षप्रवेश फक्त शिंदे गटातच नाही, तर भाजपमध्ये सुद्धा होऊ शकतो. पक्ष प्रवेश आणि न्यायालयाच्या निर्णयाची तारीख वर खालीच आहे.पुढील १५ दिवसांत अधिवेशनाच्या आधी मोठ्या प्रमाणावर पक्ष प्रवेश होईल, असे बच्चू कडूंनी म्हटले आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन होऊन आता आठ महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. पण अजूनही दुसऱ्या टप्प्यातील विस्तार झालेला नाही. विशेष म्हणजे मंत्रिमंडळाच्या विस्तारावरुन शिंदे गटाच्या नेत्यांनी आधाही नाराजी व्यक्त केली होती. बच्चू कडूंनी सुद्धा जाहीरपणे यावर नाराजी व्यक्त केली होती.
मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात की लवकरच विस्तार होणार आहे. पण मंत्रिमंडळाच्या विस्ताराची तारीख अजूनही जाहीर कऱण्यात आलेली नाही. त्यामुळे विरोधकांकडूनही यावर टीका केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
अजून त्यांच्या सरणाची राख निवली सुद्धा नसेल, तुम्ही…; वसंत मोरेंचा शिंदे फडणवीसांना सवाल, राज ठाकरेंची झाली कोंडी
काश्मीरमध्ये सापडला भारतातील सर्वात मोठा खजिना, पालटणार अख्ख्या भारताचं नशीब
‘भाभी जी घर पर हैं’ गोरी मॅम सौम्या टंडनला आला भयानक अनुभव, म्हणाली- मी ओरडत राहिले, पण…