भारतातील सर्वात चर्चेचे ठिकाण म्हणून जम्मू काश्मीरला ओळखले जाते. जम्मू काश्मीरला पृथ्वीवरील स्वर्ग असेही म्हटले जाते. तसे त्याचे नैसर्गिक सौंदर्य सुद्धा आहे. जम्मू काश्मीर हे नेहमी सुरक्षांमुळे चर्चेत असते. कारण तिथे दहशतवादी हल्ले मोठ्या प्रमाणात होत असतात.
अशात जम्मू काश्मीर हे एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहे. जम्मूमध्ये भारताच्या हाती मोठा खजिना लागला आहे. या खजिन्यामुळे संपुर्ण भारताचे नशीब पलटू शकते. जम्मूमध्ये असा खजिना सापडला आहे, ज्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला त्याचा मोठा फायदा होणार आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये एकूण ५.९ लाख टन लिथियमचा साठा सापडला आहे. त्यामुळे वाहतूक उद्योगाला त्याचा चांगला फायदा होणार आहे. तसेच त्यामुळे वाहतूक उद्योगाला चालना सुद्धा मिळणार आहे, अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे. लिथियमचा वापर इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या बॅटरीमध्ये केला जातो.
मिळालेल्या माहितीनुसार, जम्मूच्या सलाल-हिमानामध्ये हा लिथियमचा साठा सापडला आहे. इथे एकूण ५१ ब्लॉक सापडले आहेत. यापैकी ५ ब्लॉक्स लिथियम, गोल्ड, पोटॅश, मॉलिब्डेनमचे आहे. हा खजिना २०१८-१९ मध्ये शोधण्यास सुरुवात करण्यात आली होती.
त्यामध्ये १७ ब्लॉक्स हे कोळशाच्या साठेचे असल्याचे म्हटले जात आहे. तसेच लिथियमचा साठा हा ५.९ लाख टन इतका आहे. त्यामुळे भारतात इतक्या मोठ्या प्रमाणात लिथियम सापडणं ही आनंदाची बाब आहे. कारण त्यामुळे लिथियमचे अनेक फायदे असून अनेक उद्योगांना लिथियममुळे चालना मिळू शकते.
लिथियमचा आरोग्यसाठाही फायदा आहे. उन्माद, मूड स्विंगची तीव्रता आणि गंभीरता कमी करण्यासाठी लिथियमचा उपयोग केला जातो. त्यामुळे नैराश्य कमी होते. लिथियमचे औद्योगिक जगतातही अनेक फायदे आहे. उष्णता प्रतिरोधक काच, सिरॅमिक्स, ग्रीस स्नेहक, लोह, पोलाद अशा अनेक गोष्टींसाठी लिथियमचा वापक केला जातो.
महत्वाच्या बातम्या-
राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार? पवारांच्या सर्वात विश्वासू नेत्याने दिली फडणवीसांसोबत गुप्त चर्चेची कबुली, म्हणाला..
आता अदानी ग्रुप हिंडनबर्गला शिकवणार धडा, उचललं ‘हे’ मोठं पाऊल
सकाळी ज्याच्याविरोधात बातमी टाकली, दुपारी त्याच्यात गाडी खाली येऊन झाला पत्रकाराचा मृत्यू