दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली संघाला पहिल्याच सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. यासह दक्षिण आफ्रिकेने मालिकेतही 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
गुरुवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या T20 सामन्यात संघाचे नेतृत्व करत असलेल्या ऋषभ पंतने स्टार गोलंदाज युजवेंद्र चहलला पुर्ण 4 षटके टाकू दिली नाहीत. त्यानंतर झहीर खान ऋषभ पंतच्या या निर्णयावर संतापला. टी-20 मालिका सुरू होण्यापूर्वी सराव सुरू असताना टीम इंडियाचा कर्णधार केएल राहुल जखमी झाला आणि मालिकेतून बाहेर पडला, त्यानंतर संघाची कमान ऋषभ पंतकडे सोपवण्यात आली.
कर्णधार म्हणून ऋषभ पंतला पहिल्या T20 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. संघाचा स्टार गोलंदाज युजवेंद्र चहलकडून संपूर्ण 4 षटके टाकली नाहीत, त्यानंतर माजी गोलंदाज झहीर खान ऋषभ पंतवर भडकला. चहलच्या षटकांचा नक्कीच पुरेपूर वापर न करणे ही एक गोष्ट आहे ज्यावर पंतला लक्ष केंद्रित करावे लागेल आणि संघ व्यवस्थापनाने देखील त्याच्याशी याबद्दल चर्चा केली पाहिजे.
चहलला कठीण काळात पुनरागमन करताना आपण अनेकदा पाहिले आहे. त्याच्याकडे पुनरागमन करून संघाला यश मिळवून देण्याची क्षमता आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यातील पराभवानंतर झहीर खानने ऋषभ पंतवर निशाणा साधला की, सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाला नवीन फलंदाजांना मैदानात आणण्याची गरज होती.
पुढे झहीर म्हणाला की, हा एक कॉल होता जो तुमच्या हातात होता. असे असू शकते की अक्षर पटेलच्या शेवटच्या षटकाने पंतला असे वाटले असेल की सध्या फिरकी गोलंदाज हा पर्याय नाही परंतु चहलकडे त्याच्यापेक्षा अधिक क्षमता आहे. दक्षिण आफ्रिकेला 10 षटकात 12.50 च्या धावगतीने धावा करायच्या होत्या.
रनरेट आणखी वाढेल अशी आशा होती कारण जेव्हा धावगती 14-15 पर्यंत पोहोचते तेव्हा विकेट्स जास्त येतात आणि फलंदाजांवर दबाव वाढतो. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांना त्यात अपयश आले, असं म्हणत झहीर खानने नाराजी व्यक्त केली. गुरुवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या T20 सामन्यात ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा 7 विकेट्सनी पराभव झाला.
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेसमोर 211 धावांचे लक्ष्य ठेवले होते, ज्यामध्ये सलामीवीर इशान किशनने 48 चेंडूत 76 धावा केल्या. यादरम्यान त्याच्या फलंदाजीतून 11 चौकार आणि 3 षटकारही आले. याशिवाय इतर फलंदाजांनीही स्फोटक फलंदाजी केली.
टीम इंडियाची ही डोंगराएवढी धावसंख्या दक्षिण आफ्रिकेने ५ चेंडू शिल्लक असताना पूर्ण केली. दक्षिण आफ्रिकेकडून रासी व्हॅन डर ड्युसेन 75 (46) आणि डेव्हिड मिलर 64 (31) यांनी अर्धशतके झळकावली. पहिल्या T20 सामन्यातील पराभवानंतर आता दुसऱ्या सामन्यात टीम इंडिया विजयाच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
6,6,4,4! आफ्रिकेच्या केशव महाराजला ईशान किशनने धु धु धुतलं, पाहा जबरदस्त व्हिडीओ
“तर मग हा शो बंद करून…” , ‘तारक मेहता’ मालिकेच्या निर्मात्यांवर चाहते संतापले
रिकी पॉन्टिंगने दिल्ली नाही तर ‘या’ संघाशी केला ३ वर्षांचा करार, दिल्ली कॅपिटल्सला आले टेंशन
आव्हाड-यशोमती ठाकूर यांचं मत बाद करण्याची भाजपची मागणी, वाचा नेमकं काय घडलं ?