उल्हासनगर महापालिकेतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महापालिकेत एका जनसंपर्क अधिकाऱ्याने नोकरीचे आमिष दाखवत एका महिलेवर बलात्कार केला आहे. बलात्कार करणाऱ्या आरोपीचे नाव युवराज भदाणे असे आहे. या आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (yuvraj bhadane rape women)
युवराज भदाणे याने २९ वर्षीय महिलेला उल्हासनगर महापालिकेत नोकरीचे आमिष दाखवून तुर्भे नवी मुंबई येथील लॉजवर नेऊन बलात्कार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी एपीएमसी पोलिस ठाण्यात शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात महिलेवर लैंगिक अत्याचार केले होते.
सध्या भदाणे फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे. महापालिका आयुक्तांच्या आदेशाने सहाय्यक आयुक्त अत्युत सासे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. युवराज भदाणेवर २९ महिलेवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
युवराज भदाणे याने महिलेला नोकरीचे आमिष दाखवले होते. नोकरी देण्याचे आमिष दाखवून भदाणे महिलेला नोव्हेंबर महिन्यात नवी मुंबईतील तुर्भे येथील एका लॉजमध्ये घेऊन गेला होता. तिथे त्याने महिलेवर बलात्कार केला.आता घाबरलेल्या महिलेने अखेर पोलिस ठाणे गाठत युवराज भदाणेविरोधात तक्रार दिली.
दरम्यान, उल्हासनगर महापालिकेत युवराज भदाणेने जनसंपर्क अधिकारी पदाच्या नोकरीसाठी शाळा सोडण्याच्या दाखल्यात फेरफार केली होती. या प्रकरणी गेल्यासोमवारीच मध्यवर्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. असे असतानाही महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी भदाणेच्या निलंबनाच्या फाईलवर सही केलेली नाही.
तसेच मध्यवर्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर युवराज भदाणे हा फरार झाला आहे. आता पोलिस त्याचा तपास करत आहे. पण पोलिसांनी अजूनही अटक न केल्यामुळे तर्क वितर्क लढवले जात आहे. या घटनेमुळे संपुर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे.
महत्वाच्या बातम्या-
रशिया प्रमाणे भारतानेही पाकव्याप्त कश्मीरवर हल्ला करावा का? वाचा काय आहे परिस्थीती..
मला मराठी येत नव्हती याची मला लाज वाटायची त्यामुळे.., मराठी दिनानिमित्त आमिर खानचा मोठा खुलासा
मी तुमच्याकडे पुणे महानगरपालिकेसाठी मतांची भीक मागायला आलोय आणि.., चंद्रकांत पाटलांचे पुणेकरांना आवाहन