Share

सरदेसाईंसमोरच युवासेनेच्या दोन गटांत राडा, एकमेकांचे कपडे फाडत केली हाणामारी; पहा व्हिडीओ

औरंगाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. औरंगाबादच्या संत एकनाथ सभागृहाच्या बाहेर युवासेनेच्या दोन गटात तुफान हाणमारी झाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परीसरात एकच खळबळ उडाली आहे. पण अद्याप ही हाणामारी नक्की कशावरुन झाली आहे, याबाबत माहिती मिळालेली नाही. (yuvasena workers fight viral video)

औरंगाबादमधील या हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ही हाणामारी इतकी भयानक होती की याठिकाणी कार्यकर्त्यांनी एकमेकांचे कपडेही फाडले आहे. याचेही काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

युवासेनेतील अशी गटबाजी याआधीही अनेकदा समोर आलेली आहे. वरुण सरदेसाई सुद्धा त्यावेळी औरंगाबादमध्येच होते. आगामी महापालिकेच्या निवडणूकीत कशाप्रकारे काम करायचं आणि काय रणनिती आखायची याचं मार्गदर्शन करण्यासाठी ते औरंगाबादला आले होते.

औरंगाबादच्या संत एकनाथ सभागृहात वरुण सरदेसाई दाखल झाले आणि त्यांनी कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन केले. मात्र वरुण सरदेसाई तिथून बाहेर पडताच युवासेनेच्या दोन गटांमध्ये राडा झाला आहे. या घटनेनंतर युवा सेनेचे शहराध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

https://twitter.com/TumchiGosht/status/1509026727246262272?t=6nkB5ZbVYjpWH-5j_2iuPA&s=19

या कार्यक्रमात सर्व पदाधिकारी एकत्रितपणे बसले होते. कार्यक्रमासाठी वरुण सरदेसाई आले होते. सर्वांच मार्गदर्शन झाल्यावर प्रमुख पदाधिकारी निघून गेल्यावर जेव्हा कार्यकर्ते सभागृहातून बाहेर पडत होते. त्यावेळी एकमेकांना धक्का लागल्यामुळे दोन युवकांमध्ये हाणामारी झाली. ते युवासेनेचे कार्यकर्ते होते की, बाहेरचे होते याचा आम्ही तपास करत आहोत, असे राजेंद्र जंजाळ यांनी म्हटले आहे.

तसेच जर ते संघटनेचे किंवा पक्षाचे कार्यकर्ते असतील तर नक्कीच वरिष्ठांपर्यंत ही बाब जाईल. जर त्यांनी शिस्तभंग केली असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. सभागृहाच्या गॅलरीत कुठलाही वाद झाला नाही. गर्दी झाली होती, त्यामुळे कार्यकर्त्यांना खाली बसवण्यात आलं होतं. कार्यक्रमाच्यावेळी कुठलाही वाद झालेला नाही, असेही राजेंद्र जंजाळ यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
हिरो स्प्लेंडरचे इलेक्ट्रिक व्हर्जन होणार लाँच, २४० किमी असेल रेंज; जाणून घ्या फिचर्स अन् किंमत
तुळशीहार गळा कासे पितांबर..! पंतप्रधान मोदी बनले वारकरी; हातात विना अन् डोक्यावर फेटा, फोटो तुफान व्हायरल
शरद पवार करणार युपीएचं नेतृत्व; कार्यकारीणीच्या बैठकीत अध्यक्षपदाचा ठराव मंजूर

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now