Share

गौतमी सांगून दमली पण पोरं ऐकेनात; डॉक्टरांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात तरुणांचा धुडगूस, वाचा नेमकं काय घडलं

gautami patil

Gautami Patil: लावणी क्वीन म्हणून ओळखली जाणारी गौतमी पाटील (Gautami Patil) सध्या वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत आहे. सध्या महाराष्ट्रात गौतमी पाटील नाव नवं राहिलेलं नाही. गौतमीचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. अनेक तरुण गौतमीच्या सौंदर्यवर आणि फॅशनवर देखील फिदा आहेत.

गौतमी पाटीलचे कार्यक्रमातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. आता आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये गौतमी स्टेजवर डान्स करत आहे. तर त्यावेळी एक तरूण स्टेजवर येऊन तिला फटका लावण्याचा प्रयत्न करत आहे. हे पाहताच गौतमीने डान्स थांबवला आणि आयोजकांनी त्या तरुनाला बाजुला केले.

गौतमीच्या अनेक ठिकाणी लावण्या होतात. आणि तिची लावणी पाहण्यासाठी मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाते. नुकतेच पुण्यातील शिरुर तालुक्यातील एक कार्यक्रमात गौतमी पाटीलने हजेरी लावली. त्यावेळी केलेल्या नृत्यामुळे गौतमी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

कवठे येमाई येथील पंचायत समिती सदस्य डॉ. सुभाष पोकळे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले होते. तेथिल कार्यक्रमात गौतमीचा डान्स पाहताच प्रेक्षकांना चांगलाच राडा घातला.

या कार्यक्रमात प्रेक्षक अक्षरशः बेभान होऊन नाचत होते. गौतमीच्या नृत्यावर महाराष्ट्रातून टीकेची बरसात होत आहे. गेला काही दिवसांपूर्वी तिच्यावर लावणीचा कार्यक्रम अश्लील असल्याचा आरोप करण्यात आला होता.

दरम्यान, गौतमीच्या लावणी कार्यक्रमात तिच्याकडून होणारे अश्लील हावभाव, हातवारे, इशारे यामुळे प्रचंड प्रमाणात त्या लावणी कार्यक्रमाला प्रचंड गर्दी होत आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होत आहे. दिलखेचक अदा आणि आपल्या नृत्यामुळे सर्वांना भुरळ घालणारी प्रसिद्ध लावणीकार गौतमी पाटील अडचणीत येण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या – 

ताज्या बातम्या मनोरंजन राजकारण

Join WhatsApp

Join Now