सध्या राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकजण या पावसाचा घरी बसू मनसोक्त आनंद घेत आहे, तर अनेकजण या पावसात फिरायला सुद्धा जात आहे. अशात सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. (youngesters group dance on road video)
डोंगर, धबधबा, गडकिल्ले फिरायला जाणाऱ्या तरुणांचा हा व्हिडिओ आहे. प्रत्येक क्षणाचा आनंद आपण कशाप्रकारे घेऊ शकतो हे दाखवणारा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये १०-१५ तरुण चक्क ट्रकच्या हॉर्नवर ठेका धरताना दिसून येत आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये फिरायला आलेल्या तरुणांचा एक ग्रुप दिसत आहे. तसेच ते एका घाटात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी थांबलेले दिसून येतात. पण अचानक तिथे एक ट्रक येतो आणि तो ट्रक हॉर्न वाजवायला लागतो. हे पाहून तरुण बाजूला सरकण्याऐवजी तिथेच डान्स करण्यास सुरुवात करतात.
या व्हिडिओमध्ये काही तरुण नागीन डान्स करताना दिसून येत आहे. तर काहीजण हे मोर डान्स करताना दिसून येत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर खुप व्हायरल होत आहे. पण अशाप्रकारे घाटाच्या रस्त्यात डान्स करणं धोक्याचंही ठरु शकतं.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकजण यावर प्रतिक्रिया देत आहे. काहींनी अशाप्रकारे घाटात थांबणं चुकीचं असल्याचे म्हटले आहे. पावसाळ्यात गाड्या घसरण्याची किंवा दरड कोसळण्याची भिती असते, त्यामुळे घाटात जास्त वेळ थांबणं धोक्याचंही ठरु शकतं, असे काहींनी कमेंटमध्ये म्हटले आहे.
निमित्त पाहिजे..!!😅 #पावसाळा #नागीण लय हसलो…!😅🤣😂 pic.twitter.com/JGY0k4z6CE
— Kiran Arun Kadupatil (@kiran_kadu) July 11, 2022
दरम्यान, अशाच प्रकारचा आंबोली घाटातील एक व्हिडिओ रविवारी व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओमध्ये तरुण भररस्त्यात डान्स करताना दिसून येत होते. तरुणांच्या अशा वागण्यामुळे तिथे असणाऱ्या इतर पर्यटकांना त्रास सहन करावा लागला होता.
महत्वाच्या बातम्या-
“मी काही इतक्या लवकर जात नाही”, कॅन्सर झाल्यानंतर शरद पवारांनी डॉक्टरांसोबत लावली होती पैज
“पैज लाव…मी काही इतक्या लवकर जात नाही”, शरद पवारांनी सांगितला कॅन्सरबद्दलचा किस्सा
सुप्रीम कोर्टाचा शिवसेनेला धक्का तर शिंदे गटाला दिलासा; १६ आमदारांच्या अपात्रता याचिकेवर दिले ‘हे’ आदेश