दिल्लीतील आयएएस अधिकारी के. सारंगी यांनी उत्तर प्रदेशच्या गाझियाबादच्या पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. अब्दुल रहमानने त्यांची एकुलती एक मुलगी डॉ.हर्ष भारती सारंगीला फसवून लग्न केल्याचा आरोप त्यांनी केला. मुलीचे धर्मांतर व्हावे असा तरुणाचा हेतू होता. (young boy attack on IAS daughter)
तसेच लग्न करणाऱ्या दोन संस्थांचाही या कटात सहभाग असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. एफआयआरमध्ये सारंगी यांनी म्हटले आहे की, माझी मुलगी एमबीबीएस करून २०१६ मध्ये युक्रेनमधून परतली होती. मेरठमधील मवाना येथे राहणारा अब्दुल रहमान २०१७ पासून तिचा पाठलाग करत होता. त्यानंतर त्याने आपल्या प्रेमाच्या जाळ्यात तिला ओढण्याचा प्रयत्न होता.
काही लोकांनीही अब्दुलला यामध्ये साथ दिली. तसेच लग्नाला होकार देण्याशिवाय पर्याय नसावा म्हणून अब्दुलने मुलीचा चेहरा उकळत्या तेलाने जाळण्याचा प्रयत्न केला. आता आयएएस वडिलांनी अब्दुल रहमान, वैदिक हिंदू सभेचे पदाधिकारी, गाझियाबाद, आर्य समाज मंदिर ट्रस्ट, दिल्लीचे पदाधिकारी यांच्याविरोधात एफआयआर दाखल केली आहे.
एफआयआर नोंदवल्यानंतर आर्य समाजाचे आचार्य रमाशंकर पुरोहित म्हणाले की, लग्नासाठी जोडप्यांकडून प्रतिज्ञापत्रे घेतली जातात आणि कुटुंबीयांना माहिती दिली जाते. धर्मांतर केल्याशिवाय आर्य समाजाच्या मंदिरात विविध धर्माच्या लोकांमध्ये विवाह होऊ शकत नाही. लग्न करणारे जोडपे हिंदू असले पाहिजेत.
कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी अब्दुल आणि भारती यांनी नोव्हेंबर २०१८ मध्ये मंदिरात लग्न केले आणि नोंदणी देखील केली. सध्या दोघेही नोएडा येथे राहतात. गाझियाबादचे पोलिस कॅप्टन मुनीराज यांनी सांगितले की, तक्रार मिळाल्यानंतर कलम ४२० अंतर्गत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलाने मुलीशी फसवे लग्न केल्याची तक्रार मुलीच्या वडिलांकडून मिळाली असून, त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुलगा आणि मुलगी दोघेही एकत्र राहतात. सध्या पोलीस तपास करत आहेत. दोघांच्या चौकशीनंतर ज्या गोष्टी समोर येईल त्यानुसार कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
पंतप्रधान म्हणून कोण चांगलं असेल? शरद पवार की उद्धव ठाकरे? श्रीकांत शिंदेंनी दिले ‘हे’ उत्तर
मी पुणे शहराचं नाही तर माझ्या प्रभागाचं नेतृत्व करतोय, त्यामुळे…; भोंगे आंदोलनावर वसंत मोरे स्पष्टच बोलले
मी तेव्हा १६ वर्षांचा होता, मला आठवत नाही; भीमा-कोरेगाव दंगल सुनावणीत शरद पवारांचं उत्तर