सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. मंगळवारी दिवसभर ते गुजरातला होते. त्यानंतर ते आसामला रवाना झाले. त्यांच्यासोबत शिवसेनेचे ३५ आमदार असल्याचेही म्हटले जात आहे.
तर दुसरीकडे सत्तास्थापनेच्या हालचालींना आता वेग आला आहे. भाजपकडून सत्तास्थापनेचे काही संकेत मिळत आहेत. भाजपाने आपल्या आमदारांना कुठल्याही दौऱ्यावर जाऊ नये, संपर्कात रहावे, कोणत्याही क्षणी मुंबईला यावे लागेल, असे आदेश दिले असल्याची माहिती मिळत आहे.
विशेष बाब म्हणजे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील दिल्लीहून मुंबईत दाखल झाले आहेत. सध्या राज्यात घडत असलेल्या राजकीय घडामोडींवर सागर बंगल्यावर बैठकांचे सत्र सुरु आहे. आता येथूनच भाजपाने आमदारांना तातडीचे आदेश पाठविले असल्याची माहिती समोर आली आहे.
यामुळे पुन्हा भाजप सत्तेत येणार असल्याच्या चर्चाना आता प्रचंड वेग आला आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी बुधवारी (आज) मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली आहे. मंत्रिमंडळाच्या या बैठकीत मुख्यमंत्री मोठा निर्णय घेणार का? याबाबत सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
तर दुसरीकडे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. सध्या घडणाऱ्या राजकीय घडामोडींमध्ये राज्यपालांची भूमिका ही महत्त्वाची असणार आहे. मात्र असे असतानाच राज्यपालांना झालेली कोरोनाची लागण चर्चेचा विषय बनला आहे.
महत्वाच्या बातम्या-
ठाकरे सरकार कोसळणार? एकनाथ शिंदे ४० आमदारांना घेऊन सुरतहून गुवाहाटीमध्ये दाखल
गुजरातला गेल्यानंतर एकनाथ शिंदेंनी पहिल्यांदाच साधला पत्रकारांशी संवाद, पहा नक्की काय म्हणाले?
अखेर एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री ठाकरेंमध्ये झाली चर्चा; वाचा दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं