Share

‘त्यानं एकदा गावी यावं, त्याची खूप आठवण येतीये’, योगी आदित्यनाथ यांना 84 वर्षीय आईची आर्त हाक

असे म्हणतात संन्यासी जेव्हा संन्यात घेतो, तेव्हा त्याच्याशी असलेल्या सर्व व्यक्तींशी त्याचा संबंध तुटतो. पण एक नाते असे असते जे कधीही तुटत नाही, ते म्हणजे आई-मुलाचं नातं. जन्म देणाऱ्या आईला कोणीही विसरु शकत नाही, मग तो एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री का असेना. (yogis mother want to meet yogi adityanath)

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. कारण ते त्यांच्या आईला भेटायला जाणार आहे. कारण त्यांच्या आईनेच त्यांना बोलावले आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ते उत्तराखंडमधील पौडी जिल्ह्यातील पंचूर गावात त्यांच्या ८४ वर्षीय आई सावित्री देवी यांना भेट देणार आहे.

योगी आदित्यनाथ यांचे वडील आनंद सिंह बिश्त यांचे दोन वर्षांपूर्वी २०२० मध्ये कोरोना काळात निधन झाले. मात्र कोविड प्रोटोकॉलमुळे योगी वडिलांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यानंतर योगी या दोन वर्षांत एकदाही आईशी बोलले नाहीत.

एका मुलाखतीत याचे कारण सांगताना ते म्हणाले की, वडिलांच्या निधनानंतर भीती आणि संकोचामुळे ते आईशी बोलू शकले नाही. आज मी जो काही आहे तो त्यांच्या कृपेनेच आहे. लहानपणी माझी पहिली शिक्षिका माझी आई होती. या भेटीबाबत सांगायचे तर योगी यांनी ५ वर्षांपूर्वी फेब्रुवारी २०१७ मध्ये भाजप उमेदवार रितू खंडुरी यांच्या प्रचारासाठी गेले असताना त्यांच्या आईची भेट घेतली होती.

त्याच मुलाखतीत त्यांनी निवडणुकीच्या निकालानंतर आईला भेटायला नक्कीच जाणार असल्याचे सांगितले होते. आता उत्तर प्रदेश निवडणुकीचे निकाल आले आणि योगी पुन्हा मुख्यमंत्री म्हणून निवडून आले. यादरम्यान मीडियाने त्यांच्या आईशी संवाद साधला होता. सावित्रीदेवी भरल्या कंठाने म्हणाल्या होत्या, त्याने एकदा गावी यावे, त्याची आठवण येत आहे.

आईची ही हाक योगी आदित्यनाथ यांच्यापर्यंत पोहोचली आणि तब्बल महिनाभरानंतर त्यांनी उत्तराखंडमधील पौडी जिल्ह्यातील यमकेश्वर तालुक्यातील पंचूर गावात जाण्याचा कार्यक्रम आखला आहे. अधिकृत तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत, मात्र तीन दिवसांच्या दौऱ्यात ते ४ आणि ५ मे रोजी त्यांच्या गावी जाऊन आईला भेटू शकतील, अशी चर्चा आहे.

महत्वाच्या बातम्या-
…अन् अमित ठाकरे औरंगाबादला येताना रस्ताच चुकले; पहा नक्की काय घडलं
ए भोगी, कुछ तो सीख हमारे योगी से, म्हणणाऱ्या अमृता फडणवीसांना शिवसेनेचं उत्तर; म्हणाले, फडणवीस बायकोला…
करीना कपूरची ‘ती’ अवस्था पाहून चाहत्यांनाही काही सुचेना; म्हणाले तिसऱ्यांदा प्रेग्नेंट…

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now