Share

सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होत योगी आदित्यनाथ ३७ वर्षांनंतर रचणार नवा इतिहास

विधानसभा निवडणुकांची मतमोजणी प्रक्रिया सुरु झाली असून काही वेळातच निकालाचे कल स्पष्ट होणार आहेत. या मतमोजणीत उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. जर यावर्षी सुध्दा भाजपच्या हाती उत्तर प्रदेशची सत्ता आली तर अजून एक विक्रम योगी आदित्यनाथ यांच्या नावे होणार आहे.

उत्तर प्रदेशमध्ये भाजप सत्तेत येताच सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याचा मान ३७ वर्षानंतर योगी आदित्यनाथ यांना मिळणार आहे. राज्यात १९८५ नंतर जनतेने कोणत्याच पक्षाला दुसऱ्या वेळी सत्ता दिलेली दिसत नाही. १९८५ मध्ये काँग्रेसच्या नारायण दत्त तिवारी यांनी सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.

त्यानंतर मात्र आजवर कोणाला ही सत्ता टीकवून ठेवता आली नाही. जर योगी आदित्यनाथ पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री झाले भाजपच्या हाती मोठे यश येणार आहेत. मुख्य म्हणजे यावर्षी सुध्दा योगी आदित्यनाथ यांच्या हाती सत्ता आली तर ते सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होणारे पाचवे मुख्यमंत्री ठरतील.

आतापर्यंत उत्तर प्रदेशमध्ये कल्याण सिंह, रामप्रकाश गुप्ता, राजनाथ सिंग मुख्यमंत्री राहिले असून यापैकी कोणीही दुसऱ्यांदा सत्तेत आले नाही. परंतु सध्या मतमोजनीचे कल पाहता योगींच्या नेतृत्वाखाली भाजप पुन्हा सत्तेत येईल असे स्पष्ट दिसून येत आहे.

मतमोजणीचे आकडे पाहता 316 जागांसाठी कल हाती आले आहेत. यामध्ये भाजप 200 जागांसह आघाडीवर आहे. तर सपा 105 जागा, बसप, 05, अन्य 03, काँग्रेस 03 जागांवर आहे. भाजपने बहुमताचा आकडा पार केला आहे.

तर आप 45 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे काँग्रेस सुध्दा 35 जागांवर आघाडीवर आहे. गोव्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे. सध्या काँग्रेस 17 तर भाजप 14 जागांवर आघाडीवर असल्याच दिसताय.

महत्वाच्या बातम्या
‘तेव्हा लोक मला म्हणायचे की, तु हिरोईनसारखी दिसत नाहीस’; माधुरीने जुन्या आठवणींना दिला उजाळा
काॅंग्रेसच्या पराभवानंतर प्रियांका गांधींनी दिला कार्यकर्त्यांना धीर; म्हणाल्या, निराश होण्याचे कारण नाही..
समाजवादी पक्ष पराभव स्वीकारायला तयार नाही; कार्यकर्त्यांना केलं आवाहन, ‘बुथवर उभे राहा, सपा नक्की जिंकेल’
‘गोवा और युपी में ‘म्याव म्याव’ की आवाज नहीं सुनाई दीं भाई, व्हेरी सॅड’, नितेश राणेंनी शिवसेनेला डिवचले

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now