Share

आवाराच्या बाहेर लाऊडस्पिकरचा आवाज नाही आला पाहीजे, नाहीतर…; मुख्यमंत्री योगींचे थेट आदेश

yogi

दिल्लीतील जहांगीरपुरी येथे धार्मिक यात्रेदरम्यान हिंसाचाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील धार्मिक कार्यक्रमांबाबत अधिक सतर्क राहण्यास सांगितले आहे. त्यांनी पोलिस आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या ४ मे पर्यंतच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत. (yogi adityanath on loudspeaker)

तसेच लाऊडस्पीकरचा आवाज केवळ धार्मिक परिसरापुरता मर्यादित ठेवण्यास सांगण्यात आले आहे. योगी यांनी सोमवारी रात्री व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पोलिस आणि प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी चर्चा केली, त्यावेळी त्यांनी हा आदेश दिला आहे.

धार्मिक कार्यक्रम आणि पूजा नियोजित ठिकाणीच व्हायला हवी. रस्ता, वाहतूक विस्कळीत करून कोणताही धार्मिक कार्यक्रम होऊ नये. प्रत्येकाला आपापल्या धार्मिक विचारसरणीनुसार स्वत:च्या उपासना पद्धतीचे पालन करण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यासाठी लाऊडस्पीकर वापरता येईल, पण लाऊडस्पीकरचा आवाज आवारातून बाहेर येणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच गेला तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे योगी आदित्यानाथ यांनी म्हटले आहे.

तसेच परवानगीशिवाय कोणतीही मिरवणूक किंवा धार्मिक मिरवणूक काढू नये, असेही योगी म्हणाले. परवानगी देण्यापूर्वी आयोजकांकडून शांतता आणि सलोखा राखण्याबाबत प्रतिज्ञापत्र घेण्यात यावे. ज्या धार्मिक मिरवणुका पारंपारिक आहेत त्यांनाच परवानगी देण्यात यावी, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

अलीकडच्या काळात विविध धर्मांचे अनेक सण आयोजित करण्यात आले आहेत. संपूर्ण राज्यात शांतता आहे. हे आनंददायी आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकाची सुरक्षा ही आपल्या सर्वांची प्राथमिक जबाबदारी आहे. आपल्या या जबाबदारीबद्दल आपण सदैव जागृत राहिले पाहिजे, असेही योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

यावेळी प्रत्येक सण शांततेत पार पडावा यासाठी स्थानिक गरजा लक्षात घेऊन आवश्यक ते सर्व प्रयत्न करावेत, असे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहे. तसेच भडक विधाने करणाऱ्या, वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अराजक घटकांवर कारवाई झाली पाहिजे, असेही योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
लोकांना झटपट श्रीमंतीचं स्वप्न दाखवणाऱ्या Amway कंपनीला ईडीचा दणका; कोट्यवधींची संपत्ती जप्त
राज्यात भाजपचं सरकार असताना भोंगे का काढले नाहीत? प्रविण तोगडिया यांचा भाजपला सवाल
सोनम कपूरच्या घरी करोडोंची चोरी करणाऱ्या आरोपींना अटक; चोरीचे कारण ऐकून धक्का बसेल

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now