Share

‘या’ आहेत जगातील ५ सर्वात सुंदर महिला क्रिकेटपटू, फोटो पाहून लागेल वेड

महिला क्रिकेटने गेल्या काही वर्षांत जगभरात आपले स्थान निर्माण केले आहे. महिला क्रिकेटपटूंच्या शानदार खेळासोबतच त्यांच्या सौंदर्यानेही चाहत्यांवर आपली छाप सोडली आहे. सध्या न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या महिला विश्वचषक स्पर्धेत जगभरातील आघाडीचे संघ आणि महिला क्रिकेटपटू सहभागी होत आहेत. (worlds most beautiful women cricketer)

या विश्वचषकमध्ये एकूण आठ संघ सहभागी होत आहेत. शुक्रवारपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत तीन रोमांचक सामने खेळले गेले ज्यामध्ये महिला क्रिकेटपटूंनी आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्यामध्ये असे अनेक महिला क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी खेळासोबतच आपल्या सौंदर्यामुळे चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. आज आपण त्यांच्याच बद्दल जाणून घेणार आहोत.

१. एलिस पेरी

ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर एलिस पेरी ही महान अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे. महिला क्रिकेटपटूंमध्ये तिने गोलंदाज आणि फलंदाज म्हणून अनेक शानदार खेळी खेळल्या आहेत. ३१ वर्षीय पेरीने आतापर्यंत ५२२५ आंतरराष्ट्रीय धावा आणि ३०८ विकेट्स घेतल्या आहेत. ती जगातील सर्वात सुंदर महिला क्रिकेटर आहे.

२. स्मृती मानधना


स्मृती मानधना ही भारतीय महिला संघातील सर्वात लोकप्रिय आणि स्टार खेळाडूंपैकी एक आहे. तिला लेडी सेहवाग म्हणूनही ओळखले जाते. स्फोटक शैलीत फलंदाजी करण्यासोबतच डावखुरी सलामीवीर मानधना तिच्या सौंदर्यासाठीही ओळखली जाते. ज्युनियर क्रिकेटमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या स्मृतीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रम केले आहेत. २५ वर्षीय स्मृतीने आतापर्यंत तिन्ही फॉरमॅटमध्ये ४७०० हून अधिक धावा केल्या आहेत. भारतीय संघाव्यतिरिक्त तिने बिग बॅश लीगमध्येही चांगली कामगिरी केली आहे.

४. कैनात इम्तियाज


पाकिस्तानची अष्टपैलू खेळाडू कैनात इम्तियाजने २०११ मध्ये आयर्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. २९ वर्षीय कैनातची क्रिकेट कारकीर्द प्रभावी नाही पण सौंदर्यात तिच्यासमोर कोणी टिकत नाही. पाकिस्तानची फास्ट बॉलर कैनत इम्तियाज स्वतःला भारतीय फास्ट बॉलर झुलन गोस्वामीची मोठी फॅन असल्याचे सांगते.

४. सारा टेलर


इंग्लंडची माजी क्रिकेटपटू आणि स्टार यष्टीरक्षक फलंदाज सारा टेलरने तीन वर्षांपूर्वी वयाच्या २९ व्या वर्षी निवृत्ती घेतली. पण सारा ही इंग्लंडच्या महान महिला क्रिकेटपटूंपैकी एक आहे. तिने ६५०० हून अधिक आंतरराष्ट्रीय धावा केल्या तसेच गोलंदाजी करत २३२ विकेट्स घेतल्या. सारा सध्या क्रिकेटपासून दूर असली तरी ती अजूनही जगातील सर्वात सुंदर महिला क्रिकेटपटूंपैकी एक आहे.

५. होली फर्लिंग


जगातील सुंदर महिला क्रिकेटपटूंमध्ये ऑस्ट्रेलियाच्या होली फारलिंगचे नावही समाविष्ट आहे. वेगवान गोलंदाज फर्लिंगने वयाच्या १४ व्या वर्षी क्वीन्सलँडकडून पदार्पण केले जेथे त्याने सलग तीन चेंडूत विकेट घेत हॅट्ट्रिक केली. फर्लिंग ही ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील हॉट आणि ग्लॅमरस क्रिकेटर म्हणून ओळखला जाते.

महत्वाच्या बातम्या-
भाजपचे बडे नेते २-४ दिवसांत तुरुंगात जाण्याची शक्यता, मुख्यमंत्र्यांनी दिले ट्रॅक रेकॉर्ड काढण्याचे आदेश
तुमच्या अशा वक्तव्यांची जागा केराच्या टोपलीत आहे; सर्वोच्च न्यायालयाने संजय राऊतांना फटकारले
चालत्या बसमध्ये बिअर पित होते विद्यार्थी-विद्यार्थीनी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चौकशीचे आदेश

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now