सध्या गुजरातमधील एक तरुणीच एक वेगळच प्रकरण प्रचंड चर्चेत आलं आहे. हे संपूर्ण प्रकरण वाचून तुम्हालाही थोडा धक्काच बसेल. मात्र हे खरं आहे. 24 वर्षांची क्षमा बिंदू ही मुलगी येत्या 11 जूनला स्वतःशीच लग्न करणार आहे. सोशल मीडियावर सध्या या लग्नाबद्दल तुफान चर्चा सुरू आहे.
सध्या या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. लग्नासाठी तिने खास लेहंग्यापासून पार्लर आणि ज्वेलरीपर्यंत सर्व काही बुक केले आहे. स्वतःशीच लग्न करणार असली तरी या लग्नाची खास गोष्ट म्हणजे सर्व रितीरिवाजांसह हे लग्न पार पडणार आहे. सध्या याच लग्नाची चर्चा सुरू आहे.
याबद्दल सांगताना क्षमानं म्हंटलं आहे की, ‘मला कधीच लग्न करायचं नव्हतं. मात्र, माझी नवरी व्हायची इच्छा होती. म्हणून, मी स्वतः लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. कदाचित, मी माझ्या देशातील पहिली मुलगी आहे, जी स्व-प्रेमाचं उदाहरण जगासमोर ठेवलंय,’ असं तिने म्हंटले आहे.
‘स्वयं-विवाह म्हणजे स्वतःसाठी आणि स्वतःवर बिनशर्त प्रेम करण्याची वचनबद्धता आहे. सामान्यपणे लोक त्यांचे ज्यांच्यावर प्रेम आहे, त्या व्यक्तीशी लग्न करतात. माझे स्वतःवर प्रेम आहे व म्हणून मी स्वतःशीच लग्न करतेय.’असं तिने माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
तर दुसरीकडे आता याच अनोख्या लग्नावर भाजपने आपली प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाच्या वडोदरा शाखेच्या उपाध्यक्षा सुनिता शुक्ला यांनी या लग्नाला तीव्र विरोध दर्शविला आहे. तिला मंदिरात लग्न करू देणार नाही, अशी भूमिका सुनिता शुक्ला यांनी घेतली आहे.
यामुळे आता प्रकरणाला नेमकं वळण काय लागणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याबाबत पुढे बोलताना सुनिता शुक्ला याणी म्हंटले आहे की, ‘मला तिच्या लग्न करण्याच्या स्थळाविषयी अडचण आहे. कोणत्याही मंदिरामध्ये तिला स्वतःशी लग्न करता येणार नाही. अशी लग्न हिंदुत्वाच्या विरोधातली आहेत. यामुळे हिंदूंची लोकसंख्या कमी होईल.”क्षमा बिंदू ही मुलगी मानसिक रुग्ण असल्याच देखील त्यांनी सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
जितेंद्र आव्हाडांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंवर केले गंभीर आरोप; वाचा नेमकं काय म्हणाले?
‘आपण कमरेखाली वार करायचा नाही’; जितेंद्र आव्हाडांनी सांगितल्या मुंडे साहेबांच्या आठवणी..
राज्यसभा निवडणुकीत राणा दाम्पत्य ‘अशी’ करणार शिवसेनेची गोची; राजकीय समीकरण बदलणार
आव्हाड संतापले! म्हणाले, अक्षय कुमार हा मूर्ख माणूस, पुरंदरेंवरही केले ‘हे’ गंभीर आरोप