Share

पाच कोटी द्या, नाहीतर तुमच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवील; धनंजय मुंडेंना महिलेची धमकी

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते धनंजय मुंडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. एका महिलेने त्यांना धमकी दिल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्या महिलेने पाच कोटींच्या खंडणीची मागणी केली आहे. तसेच पैसे नाही दिले तर बलात्काराची तक्रार दाखल करेल, असेही त्या महिलेने म्हटले आहे. (women wants 5 crore from dhananjay munde)

मला पाच कोटी रुपये द्या. जर तुम्ही पैसे नाही दिले तर तुमच्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल करेल आणि तुमची सोशल मीडियावर बदनामी करेल, अशी धमकी त्या महिलेने धनंजय मुंडे यांना दिली आहे. त्यानंतर याप्रकरणी धनंजय मुंडे यांनी मुंबईतील मलबार हिल पोलिस ठाण्यात महिलेविरोधात तक्रार दाखल केली आहे.

आपण त्या महिलेला ओळखत नाही, असे धनंजय मुंडे यांनी तक्रारीत म्हटले आहे. तसेच आपण या महिलेला एका ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून तीन लाख रुपये दिले होते. याशिवाय एक महागडा मोबाईल कुरीअरच्या माध्यमातून पाठवला होता, असेही धनंजय मुंडे यांनी तक्रारीत म्हटले आहे.

मलबार हिल पोलिसांनी त्या महिलेविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच आता हे प्रकरण तपासासाठी गुन्हे शाखेकडे वर्ग केले आहे. आता या तपासातून कोणती नवी माहिती समोर येणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

संबंधित महिलेने यापूर्वी धनंजय मुंडेंविरोधात तक्रार दाखल केली होती. त्या महिलेने ओशिवरा पोलिस ठाण्यात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्या महिलेने तक्रार मागे घेतली होती. त्यानंतर फेब्रुवारी मार्च महिन्यात एका आंतरराष्ट्रीय नंबरवरुन महिलेने धनंजय मुंडेंना फोन केला होता.

आता त्याच महिलेने धनंजय मुंडे यांच्याकडे पाच कोटींची मागणी केली आहे. तसेच एक महागड्या मोबाईलचीही मागणी केली आहे. आपली मागणी पूर्ण न केल्यास तुमची बदनामी करेल. तसेच तुमच्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल करेल, अशी धमकीही तिने धनंजय मुंडे यांना दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-
प्रसिद्ध क्रिकेटपटू कायरन पोलार्डचा धक्कादायक निर्णय; क्रिकेटमधून घेतला कायमचा संन्यास
पाच महिन्यानंतर लालपरीला पाहून ढसा ढसा रडू लागली महिला कर्मचारी; भावूक करणारा व्हिडिओ आला समोर
मुंबई पोलीस इन ऍक्शन मोड! ‘या’ वेळेत भोंगे वाजवण्यास बंदी, नियम मोडल्यास होणार कारवाई

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now