गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक हैराण करणाऱ्या घटना घडत आहे. शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी हल्ला झाला, त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली असताना, आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. (women shocking allegetion on ganesh naik)
भाजप आमदार गणेश नाईक यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले आहे. गणेश नाईक आणि मी लिव्ह इनमध्ये राहत होतो, त्यांच्याकडून मला एक मुलगाही झाला आहे. आता ते मला आणि माझ्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देत आहे, अशी तक्रार एका महिलेने महिला आयोगाकडे केली आहे.
काही महिन्यांपूर्वीच धनंजय मुंडे यांच्यावर करुणा शर्मा यांनी केलेले आरोप ताजे असतानाच आता एका भाजप नेत्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहे. महिलेने केलेल्या खुलाश्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली असून गणेश नाईक अडचणीत येण्याची शक्यता आहे.
ते माझ्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. त्यांच्यापासून मला एक मुलगा झाला आहे. आता गणेश नाईक मला मारुन टाकण्याची धमकी देत आहे, असे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. संबंधित महिलेने १९९३ पासून आपण गणेश नाईकांसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचे सांगितले आहे.
गणेश नाईक आठवड्यातून दोन-तीन दिवस माझ्यासोबत राहायचे. त्यांचे माझ्यासोबत शरीर संबंधही होते. तेव्हा ते महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री होते. आता माझा मुलगा १५ वर्षांचा झाला आहे. त्याच्या शिक्षणाबाबत आणि भविष्याबाबत ठोस उपाययोजना करा, असे मी त्यांना सांगितले तर ते टाळा टाळ करत आहे, असे संबंधित महिलेने म्हटले आहे.
तसेच मी काही बोलले की ते मला आणि माझ्या मुलाला ठार मारण्याची धमकी देत आहे. पण माझ्या मुलाला न्याय मिळणं गरजेचं आहे. या सगळ्यांचा विचार करुन कोणाच्याही दबावाला बळी न पडता मी ही तक्रार नोंदवते आहे, असेही महिलेने म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
पवार आजपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने उतरले…; निवासस्थानावर हल्ला झाल्यानंतर धनंजय मुंडेची पहिली प्रतिक्रिया
शरद पवारांच्या घरावर हल्ला हा लोकशाहीचा पहिला खून; जितेंद्र आव्हाड भडकले
१२ तारखेला १२ वाजता बारामतीत काय घडणार? संतप्त कर्मचाऱ्यांनी सांगितला प्लॅन, सरकारच्या अडचणी वाढणार