Share

‘मतदारसंघात येऊ द्या, आम्ही दांडे सोलून ठेवलेत’, महिला शिवसैनिक बंडखोरांविरोधात आक्रमक

बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी राज्यात भाजपशी हात मिळवणी करून सरकार स्थापन केलं आहे. मात्र शिंदे यांच्या विरोधात असलेले शिवसैनिक प्रचंड आक्रमक झाले आहेत. शिंदे गटाने भाजपच्या मदतीने राज्यात शिंदे सरकार स्थापन केले आहे. यामुळे अख्ख महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येऊन कोसळलं आहे.

यामुळे आता शिवसेना पक्ष बांधणीसाठी पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. पुन्हा नव्या जोमाने शिवसेना चांगलीच कामाला लागली आहे. यासाठी आता खुद्द उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहेत. शिवसेना पुन्हा राज्यात चांगलीच सक्रिय होताना पाहायला मिळत आहे.

याच पार्श्वभूमीवर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना महिला संघटक, संपर्कप्रमुख, महिला विभाग संघटक यांची शिवसेना भवन येथे बैठक झाली. यावेळी महिला शिवसैनिक बंडखोर आमदारांविरुद्ध चांगल्याच आक्रमक झालेल्या पाहिला मिळाल्या.

विशेष बाब म्हणजे या बैठकीत साताऱ्याच्या एका महिला पदाधिकाऱ्याने थेट बंडखोर आमदारांनाच इशारा दिला. “राज्यात पुन्हा आपली ताकद उभी करायची असेल तर माझ्या भावाच्या पाठिशी उभ्या राहा. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार माझ्या महिला शिवसैनिकांच्या रक्तारक्तात आहेत,” असे या महिला शिवसैनिकाने म्हंटलं आहे.

याचबरोबर या महिला पदाधिकाऱ्याने पुढे बोलताना म्हंटलं आहे की, ‘आम्ही या कावळ्यांच्या (बंडखोरांच्या) बापाला घाबरत नाही. आम्ही त्यांच्यासोबत आधीही नव्हतो आणि आत्ताही नाही. ते उडत गेले, तर आता आमच्या मतदारसंघात येऊ द्या, आम्हीही दांडे सोडून ठेवले आहेत.’

दरम्यान, ‘सातारा जिल्ह्यातील जे आमदार गेले आहेत त्यांनी काहीही काम केलं नव्हतं. त्यामुळे ते गेले तरी आम्हाला काही फरक पडत नाही. आम्हाला कोणताही दगड-माती द्या, त्यांना निवडून आणण्याची ताकद आमच्यात आहे,’ असं म्हणत या महिला शिवसैनिकाने उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-
शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीत फूट पडण्याची शक्यता? देवेंद्र फडणवीस शरद पवारांसोबतही करणार खेळी
पैलवानांच्या तक्रारी आल्यानंतर भारतीय कुस्तीगीर संघटनेची मोठी कारवाई, शरद पवारांना धक्का
मविआ सरकार पडताच शरद पवारांना आयकर विभागाची नोटीस; सूड घ्यायला सुरवात?
उद्धव ठाकरेंनी विश्वास ठेवून सगळी जबाबदारी एकनाथ शिंदेंला दिली त्याचा हा परिणाम- शरद पवार

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now