Share

पाच लोकांना पैसे देऊन घरी बोलावलं, बलात्कार केला अन्…; पतीच्या गर्लफ्रेंडचा महिलेने ‘असा’ घेतला बदला

पती-पत्नीचे नाते हे खुप पवित्र असते. पण कधी कधी नात्यातील संशयामुळे नातं अनेकदा तुटून जाते. आपल्या पत्नीवर अत्याचार करणाऱ्या संशयित पतीबद्दल अनेकदा बातम्या समोर येत असतात. पण आता हैदराबादमधून एक विचित्र घटना समोर आली आहे. (women rape husband girfriend)

याठिकाणी एका पतीला नाही, तर पत्नीलाच आपल्या पतीवर संशय होता. इतकेच नाही, तर तिने या संशयावरुन धक्कादायक कृत्यही केले आहे. हे प्रकरण तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथील आहे, जिथे एका महिलेला तिच्या पतीचे दुसऱ्या मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय होता.

हा संशय इतका वाढला की त्या महिलेने चक्क पाच जणांना पैसे दिले आणि घरी बोलावले. तसेच त्या पाचही जणांना तिच्यावर बलात्कार करण्यास सांगितले. तसेच त्या महिलेने बलात्काराचा व्हिडिओही शुट केला. त्यानंतर पोलिसांनी आता त्या महिलेसह सहा जणांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यूपीएससीची तयारी करत असताना गायत्रीचा पती श्रीकांत त्या तरुणीला तिच्या कोचिंगमध्ये भेटला होता. पीडिता अनेकदा पतीला भेटण्यासाठी गायत्रीच्या घरी येत असे. यानंतर ती चार महिने गायत्रीसोबत त्याच्या घरी राहिली आणि निघण्यास सांगितले असता तिने नकार दिला.

त्यानंतर गायत्रीला तिच्या पतीचे महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय आला. बराच वाद झाल्यानंतर त्या तरुणीने गायत्रीचे घर सोडले. यानंतरही महिलेचा संशय दूर झाला नाही कारण तिचा नवरा अजूनही त्या मुलीला बाहेर भेटतो असे तिला वाटले. संशयाच्या सवयीमुळे त्रस्त झालेल्या महिलेने नंतर एक भयंकर कट रचला.

पतीचे दुसऱ्या महिलेशी प्रेमसंबंध असल्याचा संशय घेऊन महिलेने बदला घेण्यासाठी पाच जणांना बोलावले, नंतर सर्वांना पैसे दिले आणि सामूहिक बलात्कार करण्यास सांगितले. कोंडापूर येथील गायत्रीच्या घरात पाच जणांनी महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर तक्रार दाखल होताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

महत्वाच्या बातम्या-
कोण आहे नताशा जिच्यावर फिदा झाला गुजरात टायटन्सचा कर्णधार पंड्या? अनेक चित्रपटात केलं आहे काम
‘या’ गोष्टींमध्ये धोनीच्याही पुढे निघून गेला हार्दिक पंड्या, रोहित शर्माचाही रेकॉर्ड धोक्यात
VIDEO: माफी मागा नाहीतर.., हनुमान जन्मस्थळावरून दोन साधूंमध्ये राडा, भर सभेत उगारला माईक

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now