असे म्हणतात तुरुंगात जेवण सुद्धा न्यायचे असेल तर आधी पोलिसांची परवानगी घ्यावी लागते. त्यामुळे तुरुंगात राहून काही चुकीचं कामं करणं शक्य नाहीये. असे असतानाही कधी कधी जेलमध्ये धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर येतात. आता असेच काहीसे मध्य प्रदेशच्या तुरुंगातून समोर आले आहे. (women pregnant in jail)
मध्य प्रदेशातील सतना येथे जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेली एक महिलेबाबत एक हैराण करणारी माहिती आली आहे, त्यामुळे तुरुंग प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित महिलाही गरोदर असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कारागृहात खळबळ उडाली आहे.
हा प्रकार कसा घडला याचा तपास सुरू आहे. ही महिला काही काळ जामिनावर बाहेर होती. त्या काळात तिला गर्भधारणा झाली असावी, असा दावा तुरुंग प्रशासन करत आहे. एका तपासणी शिबिराचे कार्यक्रमावेळी महिलेची तपासणी केली असता हा सर्वप्रकार समोर आला आहे.
जिल्हा प्रशासन व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सतना कारागृहात आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिला व पुरुष कैद्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यादरम्यान या महिला कैद्यानेही पोटदुखीची तक्रार केल्याने तपासासाठी सोनोग्राफी करण्यात आली होती.
त्यानंतर जेव्हा सोनोग्राफी केली असता, ती गरोदर असल्याची बाब समोर आली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर कारागृह प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.सतना कारागृह प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, महिला कैद्यावर पती आणि सासूच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
२०१६ पासून तिच्याविरोधात खटला सुरू आहे. ही महिला खजुराहोची रहिवासी असून तिला २८ फेब्रुवारी २०२२ रोजी छतरपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. १२ मार्च रोजी सतना तुरुंगात आणण्यात आले. दरम्यान, महिला जामिनावर तुरुंगाबाहेर होती गेली तेव्हाच ती गर्भवती झाली असावी असे म्हटले जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
स्टाईलिश लूक, जबरदस्त ऍब्स, शाहरुख खानने शेअर केला ‘पठाण’चा पहिला लूक; कॅप्शनने लोकांना लावले वेड
“काश्मिरी पंडितांवर अत्याचार दहशवाद्यांनी केला होता, त्यासाठी मुस्लिमांना दोष देणं योग्य नाही”
हे फक्त धोनीच करू शकतो! पहिल्याच सामन्यात केला आगळा वेगळा विक्रम, सचिन-द्रविडलाही टाकले मागे