Share

अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या जावयाची सासूने केली हत्या, पुण्यातील धक्कादायक घटना

प्रेम प्रकरणातून अनेक धक्कादायक घटना समोर येत असतात. आता अशीच एक घटना पुण्यातून समोर आली आहे, ज्यामुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. सासूच्या अनैतिक संबंधात अडचण ठरत असलेल्या जावायाची सासू आणि मुलीने कट रचून हत्या केली आहे. (women kill son in law)

आता या प्रकरणी मृतव्यक्तीच्या पत्नीसह सासूला आणि तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे. आकाश गोरखे असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी ज्योती आकाश गोरखे आणि मृताची सासू सोनी उमेश जेगरे तसेच सासूचा प्रियकर अक्षय लोंढे, रामविजय महातो, साहिल पंचराश, रवी राठोड यांना अटक करण्यात आली आहे.

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पती चाळीसगावला जात असल्याचं सांगून तो बेपत्ता झाल्याची तक्रार आरोपी ज्योतीने देहूरोड पोलिसांत दिली होती. मृत आकाश हा पत्नीसह सासूकडे राहत होता. सासूचे बाहेर अनैतिक संबंध होते. पण हे अनैतिक संबंध आकाशला खटकत होते. त्याने त्याला विरोधही केला होता. त्यामुळे मायलेकीने आकाशचा काटा काढण्याचे ठरवले.

३० जानेवारी रोजी पत्नी ज्योती आणि सासू सोनी यांनी आकाशला ठरल्याप्रमाणे देहूगाव येथील कमानीपाशी सोडले. तिथून सोनी हिचा प्रियकर अक्षय लोंढे याने त्याच्या मित्रांसह आकाशला एका कारमध्ये बसवून बेदम मारहाण करुन त्याची हत्या केली आणि त्याचा मृतदेह चिखलीतील ड्रेनेजमध्ये टाकून आले.

पोलिस याप्रकरणाचा तपास करत होती. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की आकाश हा आपल्या सासू आणि पत्नीसोबत राहत होता. त्यामुळे पोलिसांना त्यांच्यावर संशय आला. पोलिसांनी सासू आणि पत्नीची कसून चौकशी केली असता त्यांनी या प्रकरणी कबूली दिली आहे.

सासू आणि पत्नी या दोघांनी मिळून आकाशची हत्या करण्याचा कट रचला होता. या प्रकरणात सासूचा प्रियकर आणि त्याचे मित्रही सहभागी होती. आपल्या प्रेम संबंधात जावई अडचण निर्माण करत असल्यामुळे त्याने तिची हत्या केल्याचे सासूने कबूल केले आहे. या घटनेमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

महत्वाच्या बातम्या-
‘मातोश्री’वरील चौघांसाठी ईडी नोटीस तयार; नारायण राणेंचा गौप्यस्फोट, राजकीय वर्तुळात उडाली खळबळ
सुखी संसार चालू असताना अचानक झाला पतीचा मृत्यु, मग पत्नीच्या आयुष्याला आले वेगळे वळण
अभिनेता चिन्मय मांडलेकरचं होतंय कौतुक; म्हणाला, जिरेटोप चढवल्यानंतर चुकूनही करत नाही ‘ही’ गोष्ट

राज्य

Join WhatsApp

Join Now