देशभरात सध्या हिजाबवरुन वाद सुरु आहे. महिलांची यात कुचंबणा झालेली दिसते. यामुळे समाजातही तेढ निर्माण होताना दिसत आहे. असे असतानाच आता तलाकचं एक वेगळंच प्रकरण समोर आलं आहे. ज्यामुळे देशभरात एकच खळबळ उडाली आहे. (women halala viral video)
मध्यंतरी केंद्र सरकारने ट्रिपल तलाकवर कायदा केला आहे. त्याला काहींनी विरोध मात्र तो कायदा आताही अस्तिवात आहे. हे सगळं असूनही महिलांची अवहेलना कमी होत नाही. आता एका महिलेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
यामध्ये महिलेला तिच्या पतीने तलाक दिला. तसेच तिची सासरची मंडळी एवढ्यावरच थांबली नाही, तर एखाद्या खेळण्याप्रमाणे या महिलेला वागणूक दिली आहे. तिला पतीने तलाक दिल्यानंतर तिला सासर आणि दीरासोबतही लग्न करण्यास भाग पाडण्यात आले होते.
संबंधित महिला ही कुठली आहे, हे समजू शकलेली नाही. तिचा विवाह २००९ साली झाला होता. दोन वर्षे तिला अपत्य झाली नाही त्यामुळे तिच्या पतीने तिला तलाक दिला. त्यानंतर हलाला (तलाक झालेल्या पत्नीशी पुन्हा लग्न) करुन परत सासऱ्याशी विवाह करण्यास भाग पाडलं. हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही, तर २०१७ साली तिला पुन्हा तलाक दिला.
https://twitter.com/VanShar1/status/1494337406665109507?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1494337406665109507%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.tv9marathi.com%2Ftrending%2Ftragic-story-behind-her-burqa-after-triple-talaq-women-was-his-wife-a-third-time-video-viral-641643.html
अशा वागणूकीनं ही महिलेला त्रासली होती. २०१७ नंतर महिलेच्या घरच्या मंडळींनी सासरच्या मंडळींची चर्चा केली. तर त्यांनी यावर अजबच उपाय काढला होता. त्यांनी तिला दीराशी लग्न करण्याची अट घातली. याला तिने नकार दिला, तेव्हा सासरच्यांनी तिला घरी नेण्यास नकार दिला.
या महिलेने आता आपलं म्हणणं सर्वांसमोर मांडलं आहे. हलाला आणि तलाकच्या विरोधात ती आक्रमक झाली आहे. तसेच तिने हलाला पद्धतीवर विरोध तर केलाच आहे, तसेच तिने महिलेच्या इच्छेविरोधात तलाक होता कामा नये, असेही तिने म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
पोतंभर नाणी घेऊन स्कुटर घेण्यासाठी पोहोचला, सुट्टे पैसे मोजून कर्मचाऱ्यांना फुटला घाम, वाचा पुढं काय घडलं..
दिशा सालियनची बलात्कार करून हत्या झाली ही गोष्ट सुशांतला समजली तेव्हा.., नारायण राणेंच्या दाव्याने खळबळ
किडनीच्या मोबदल्यात चार कोटी रुपयांचे अमिष दाखवत गायिकेने मोलकरणीला गंडवले