औरंगाबाद शहरातील मुकुंदवाडीमधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. महिलेच्या गालाचा चावा घेणाऱ्या आरोपींची न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे. काही दिवसांपूर्वीच ही घटना घडली होती. पीडित महिलेने पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता, त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले होते. (women bite other women cheek)
एका महिलेने आपल्या धाकट्या जावेच्या गालाचा चावा घेतला होता. घरगुती कारणावरुन त्यांच्यात भांडण झाले होते. त्यामुळे महिलेने आपल्या धाकट्या जावेच्या गालाचा चावा घेतला होता. त्यानंतर पीडित जावेने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. खुनाच्या प्रयत्नाच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हा खटला न्यायालयात पोहचला होता.
या प्रकरणावर सुनावणी करताना जिल्हा न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही एच खेडकर यांनी हा निकाल दिला आहे. दात हे प्राणघातक हत्यार असू शकत नाही, असे म्हणत त्यांनी आरोपींची निर्दोष सुटका केली आहे. तसेच चावा घेतल्यामुळे झालेल्या जखमा या बाबी आरोपींना शिक्षा देण्यासाठी विश्वासार्ह नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
मीनाबाई सोमनाथ पल्हाटे पीडित महिलेचे नाव आहे. त्या औरंगाबाद शहरातील हनुमाननगर परिसरात राहतात. त्यांचे थोरली जाऊ सुनीता यांच्यासोबत घरगुती मुद्यावरुन वाद झाले होते. थोरली जाऊ सुनीता हिने मीनाबाई यांच्या पतीला घरातून बाहेर जाण्यास सांगितलं होतं. तर सासऱ्यांनी बांधलेल्या घरावर आमचाही हक्क असल्याचे मीनाबाई यांनी म्हटले.
त्यानंतर दोघांमध्ये वादविवाद झाले. नंतर संतापलेल्या सुनीता यांनी आपली धाकटी जाऊ मीनाबाई यांच्या गालाचा चावा घेतला. यामध्ये मीनाबाई यांच्या नाकाच्या आणि डोळ्याच्या खाली जखमा झाल्या. त्यामुळे पीडित मीनाबाई यांनी मुकुंदनगर येथील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणी सुनीता व तिचे पती रमेश यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले होते. पण हा जीवघेणा हल्ला होता, हे पीडित महिलेला सिद्ध करता आले नाही. त्यामुळे न्यायालयाने आरोपींची निर्दोष सुटका केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
”संजय राऊत हे मानसिक रुग्णतेच्या पर्मोच्चा स्थानावर पोहोचले आहेत”
…तो पर्यंत मी लग्न करणार नाही; निवडणूकीपूर्वीच नवज्योत सिद्धूंच्या मुलीची भीमप्रतिज्ञा
रोज फक्त १०० रुपये गुंतवा आणि मिळवा १४ लाख रुपयांचा नफा, ग्रामीण लोकांसाठी पोस्टाची भन्नाट स्कीम






