Share

‘आम्ही पाकिस्तानी संघटनेचे आहोत, आमचं काम तुमच्या लेकीबाळींची इज्जत लुटणे; आॅन कॅमेरा महिलेवर बलात्कार

crime news

राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका तरुणाने विवाहित महिलेवर बलात्कार केला आणि तिचा व्हिडिओही बनवला. व्हिडिओ कुठेही व्हायरल झाला नसला तरी मोबाईल पीडितेच्या घरीच होता.

मात्र आता आरोपी तिला धमकावत आहे आणि पतीला जीवे मारण्याची धमकी देत ​​आहे.  याप्रकरणी विवाहितेच्या पतीने पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांत दिली तक्रार विवाहितेच्या पतीने 4 जानेवारी रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास पत्नी घरी एकटीच होती, अशी तक्रार दिली आहे.

दरम्यान, गावातील एक तरुण आपली मोटारसायकल घेऊन विवाहितेच्या घरात गेला. मात्र, यादरम्यान विवाहितेच्या भावजीला हा तरुण घरात येताना दिसला. पण त्याने फारसे लक्ष दिले नाही. यानंतर आरोपीने कॅमेरा ऑन करून विवाहितेवर बलात्कार केला.

अचानक काही वेळाने विवाहितेचा भाऊजी तेथे आला. हे पाहून आरोपीने आपला मोबाईल व मोटारसायकल घराबाहेर उभी ठेवून पळ काढला. पोलिसात तक्रार दिल्यास तुला आणि मुलांनाही मारून टाकीन, अशी धमकी दिली. यानंतर विवाहित महिला लाजेने माहेरी निघून गेली.

17 जानेवारी रोजी विवाहितेचा पती आपल्या शेतात जात असताना आरोपीचा भाऊ तेथे आला, त्याने त्याला सांगितले की, आम्ही पाकिस्तानच्या संघटनेशी संबंधित आहोत, आमचे काम तुमच्या बहिणी, मुली आणि महिलांची इज्जत लुटणे आहे. माझ्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दिल्यास तुझ्यावर चोरीचा गुन्हा दाखल केला जाईल.

महत्वाच्या बातम्या
बागेश्वर महाराजांनी स्विकारलं 30 लाखांचं चॅलेंज, पण.. अंनिसने घातली ‘ही’ मोठी अट
“वाघ एकला राजा बाकी खेळ माकडांचा”; शिवसेना नेत्याने शेअर केलेले ‘ते’ फोटो चर्चेत; पहा फोटो…
‘मी मुस्लीम असूनही माझ्या तालमीला छत्रपती शिवरायांचे नाव, कुस्तीला जातीय रंग देऊ नका’

इतर क्राईम ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now