भारतात अनेक साधू संत होऊन गेले आहेत. याच परंपरेचा भाग म्हणून अनेक महाराज, बाबा आजही प्रसिद्धीच्या झोतात आहेत. त्यांचे लाखोंच्या संख्येने भक्त आहेत तर वेगवेगगळ्या राज्यातूनही लोकं त्यांचे सत्संगला हजेरी लावत असता. सध्या बागेश्वर महाराज हे नाव फार चर्चेचा विषय बनला आहे.
त्यांच्या प्रवचनांच्या व्हिडीओमध्ये कीर्तनात तल्लीन झालेले भक्त दिसतात. तर कोणी अचानक वेगळेवेगळे हावभाव करतं तर कोणी भजनांच्या तालावर ठेका घेतांना दिसत आहे. काही महिलांच्या अंगात आल्याचेही बोलले जात आहे. बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री सध्या चर्चेचा विषय बनले आहेत.
नागपूरमध्ये मागील आठवड्यात त्यांचा राम कथेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. याच कार्यक्रमावेळी झालेल्या त्यांच्या दिव्य दरबारावर अंनिसने आक्षेप घेतला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी बागेश्वर महाराजांच्या या दिव्य दरबारावर आक्षेप जाहीर केला आहे.
धीरेंद्र महाराजांवरत्यांची दिव्य शक्ती सिद्ध करण्यासाठी ३० लाख रुपयांच्या बक्षीसाचे आव्हान केले आहे. हे आव्हान धीरेंद्र महाराजांनी नागपूरमध्ये न स्वीकारता त्यांच्या दिव्य दरबारात स्वीकारले आहे.
श्याम मानव यांनी यावर प्रतिक्रिया देत म्हणाले की, “९ जानेवारीला आम्ही पत्रकार परिषद घेऊन धीरेंद्र महाराज दिव्य दरबारात जे दावे करतात त्याला आव्हान दिलं आहे. महाराज दावे करतात की भक्तांचे नाव, मोबाईल नंबर, वडिलांचे नाव आपोआप ओळखता. याखेरीज ते भक्तांच्या घरातील कोणत्या खोलीत कोणती वस्तू आहे ते देखील सांगू शकतात. मी महाराजांच्या दिव्य शक्तीला आव्हान केले आहे, असे मानव यावेळी म्हणाले आहेत”.
ही आव्हान प्रक्रिया महाराजांच्या दरबारात पार पडणार नसून नागपूरमधील सर्व पत्रकारांसमोर होणार आहे. त्यासाठी एक पंचसमितीदेखील नेमली जाणार आहे, असंही श्याम मानव यांनी सांगितले आहे.बागेश्वर धामचे महाराज यांचा जन्म १९९६ मध्ये छतरपूर जिल्ह्यातील गढा गावात झाला होता, असे मिळालेल्या माहितीवरून समजले आहे. तसेच पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यात लहानपणापासूनच लोकांवर प्रभाव टाकण्याची क्षमता होती असेही म्हटले जाते.
महत्वाच्या बातम्या
सत्तेचा माज! भारतजोडो यात्रेला वर्गणी न दिल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी गरीब भाजीवाल्याचं सामान फेकलं
अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून बागेश्वर बाबांना थेट आव्हान ; चमत्कार सिद्ध केल्यास देणार ३० लाख !
“चादर चढवणे आणि मेणबत्ती लावणे श्रद्धा, पण नवसाचा नारळ फोडणे मात्र अंधश्रद्धा” कुठून येतो हा दुटप्पीपणा?